मुक्तपीठ टीम
भारताची आजवरची सर्वात मोठी टीम टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेणार आहे. भारतीय संघात २२८ सदस्य असतील. यात १२४ अॅथलीट आहेत. त्यापैकी ६९ पुरुष आणि ५५ महिला अॅथलीट आणि उर्वरित सदस्य असतील. भारतीय अॅथलीट्स यावेळी ८५ पदकांसाठी प्रयत्न करतील. जागतिक स्पोर्ट्स डेटा कंपनी ग्रेसनोटच्या अंदाजानुसार, भारत यावेळी आपल्या प्रयत्नांमध्ये चांगलं यश मिळवू शकेल.
टोकियोत लंडनची कामगिरी मागे टाकणार!
• २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने सर्वाधिक ६ पदके जिंकली होती.
• टोकियोमध्ये भारतीय संघ लंडनपेक्षा जास्त पदके जिंकू शकेल.
• या वेळी भारतीय ऑलिम्पिक संघ लंडन ऑलिम्पिकपेक्षा ३ पट अधिक पदके जिंकू शकेल.
• ग्रेसनोटच्या अंदाजानुसार, भारतीय खेळाडू यावेळी १७ पदके जिंकतील.
• भारतीय संघ टोकियो ऑलिम्पिकमध्ये ४ सुवर्ण, ५ रौप्य व ८ कांस्यपदक जिंकण्याचा अंदाज आहे.
• यापैकी ८ पदके नेमबाजीत, बॉक्सिंगमध्ये ४, कुस्तीमध्ये ३ आणि वेटलिफ्टिंग व आर्चरीमध्ये १ पदके जिंकण्याची शक्यता आहे.
लंडन ऑलिम्पिक भारतासाठी सर्वात यशस्वी!
• आतापर्यंतची भारताची २०१२ मधील लंडन ऑलिम्पिक स्पर्धा सर्वात यशस्वी आहे.
• यात भारताने २ रौप्य व ४ कांस्यपदकांसह एकूण ६ पदके जिंकली.
• २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाने १ सुवर्ण व २ कांस्यपदकांसह ३ पदके जिंकली.
• २०१६ मधील रिओ ऑलिम्पिक, १९५२ हेलसिंकी ऑलिम्पिक आणि १९०० पॅरिस ऑलिम्पिकमध्ये २-२ पदके जिंकली.
आजवरची भारतीय ऑलिम्पिक कामगिरी!
• भारतीय संघाने संघाने ९ सुवर्ण, ७ रौप्य आणि १२ कांस्य अशी एकूण २८ पदके जिंकली आहेत.
• जगातील देशांच्या तुलनेत ऑलिम्पिक पदकामध्ये भारताचा क्रमांक ५३ वा आहे.
• ऑलिम्पिकमध्ये भारताने हॉकीत सर्वाधिक पदके जिंकली आहेत.
• भारतीय संघाने १९२८, १९३२, १९३६, १९४८, १९५२, १९५६, १९६४ आणि १९८० या वर्षात ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदके जिंकली.
• या व्यतिरिक्त त्यांनी १९६० मध्ये रौप्य आणि १९६८ आणि १९७२ मध्ये कांस्यपदक जिंकले. १९८० पासून संघाने पदक जिंकले नाही.
• २००८ च्या ऑलिम्पिकमध्ये शूटिंगमधील एकमेव सुवर्ण पदक अभिनव बिंद्रा यांनी जिंकले.