मुक्तपीठ टीम
तेल कंपन्यानी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतेही चढ-उतारनसून स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. तेल कंपन्यानी नऊ दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी १६ पैशांनी घट केली होती. गेले अनेक दिवस इंधनाच्या दरात वाढ करण्यात आलेली नाही. देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुका असल्याने दर वाढवले गेले नाही, असे म्हटले जाते.
प्रमुख शहरांचे दर
• सध्या मुंबईत पेट्रोल ९६.८३ रुपये प्रति लीटर तर डिझेल ८७.८१ रुपये प्रति लीटर आहे.
• पुण्यात पेट्रोल ९६.४७ रुपये प्रति लीटर तर ८६.१३ रुपये प्रति लीटर आहे.
• दिल्लीत पेट्रोल ९०.४० रुपये प्रति लीटर तर डिझेल ८०.७३ रुपये प्रति लीटर आहे.
• जयपुर पेट्रोल ९६.७७ रुपये प्रति लीटर तर डिझेल ८९.२ रुपये प्रति लीटर आहे.
• चेन्नईत पेट्रोल ९२.४३ रुपये प्रति लीटर तर डिझेल ८५.७५ रुपये प्रति लीटर आहे.
कसे वाढतात पेट्रेल-डिझेलचे दर
• पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साइज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.
• जर केंद्र सरकारचे उत्पादन शुल्क आणि राज्य सरकारचे व्हॅट काढून टाकले गेले तर डिझेल आणि पेट्रोल प्रतिलिटर २७ रुपयांनी मिळू शकते.
• परंतु केंद्र किंवा राज्य सरकार दोघांनाही हा कर काढून टाकता येणार नाही.
• कारण सर्वात जास्त उत्पादन यातून सरकारना मिळते.
• दररोज सकाळी निश्चित केले जातात दर.
इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम याकंपन्या इंधनांच्या किंमतींची समिक्षा करुन दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केले जातात.
निवडणुका आणि इंधन दर
• अनुभव असा आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात वाढ झाली तर भारतात दर लगेच वाढतात.
• कमी झाले तर मात्र क्वचितच त्याचा फायदा भारतीय ग्राहकांना मिळतो.
• आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी झाले तर बहुतेक वेळा सरकारी करांचा बोजा वाढतो. त्यामुळे ग्राहकांसाठी दर तेच राहतात.
• आजवरच्या अनुभवांनुसार भारतात निवडणुका असल्या की सरकारचं थेट नियंत्रण नसलं तरी इंधन कंपन्याच इंधन दर वाढवत नाहीत.
• पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून भारतात इंधन दर वाढलेले नाहीत.