मुक्तपीठ टीम
कोरोना संकट काळात प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी सक्षम करण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. आभासी माध्यमातून प्रशिक्षणासह, डॉक्टर, परिचारिका आणि संबंधित आरोग्यसेवा व्यावसायिकांना आणि स्वयंसेवकांना कोरोनासंबंधित पैलूंबद्दल प्रशिक्षण प्रदान केले गेले आहे. भारत सरकारने विविध कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी एकीकृत सरकारी ऑनलाइन प्रशिक्षणासाठीच्या iGOT या माध्यमाचा वापर केला आहे.
कोरोना संकटाच्या सुरुवातीपासून, देशभरातील सुमारे १४ लाख यूजर्सनी या मंचावर नोंदणी केली आहे, विविध अभ्यासक्रमांसाठी २९ लाख ३० हजारांची नोंदणी झाली आहे. याव्यतिरिक्त, राज्य सरकारांमार्फत ८० लाखाहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनासंबंधित विषयांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि एआयआयएमएस (नवी दिल्ली), एनआयएमएचएएनएस, पीजीआयएमईआर, जेआयपीएमईआर इत्यादी नामांकित संस्थांद्वारे कोविड संबंधित विविध विषयांवरील वेबिनार आणि मार्गदर्शक सत्रेही अपलोड करण्यात आली होती. 2.23 कोटी दर्शकांनी ते पाहिले. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एमएमसी) दिलेल्या माहितीनुसार, एमबीबीएस अभ्यासक्रमात साथीच्या आजारांच्या व्यवस्थापनावर पूर्वीच्या भारतीय वैद्यकीय परिषदेच्या, प्रशासकीय मंडळाद्वारे (बीओसी-एमसीआय) ऑगस्ट, 2020 मध्ये सक्षमता-आधारित मॉड्यूल सादर केले गेले. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.