शुभम दिपक कातुर्डे
अर्थशास्त्र विषयात M.A. केले असून, सध्या एका फायनान्स कंपनी मध्ये कार्यरत आहे.
तिमीरातून तेजाचे गीत नवे गाऊ…
तिमीरातून तेजाचे गीत नवे गाऊ…
पसरला अंधार जरी,
आपण चालत राहू,
एक-एक पाऊल टाकू,
आणि अंतर कापत जाऊ,
तिमीरातून तेजाचे गीत नवे गाऊ…
उगवेल दिनकर पुन्हा नव्याने,
निशा प्रहर हा सरल्यावर,
पुन्हा ठोकून आरोळी नव्याची,
नवे अंकुर फुलवत जाऊ…
तिमीरातून तेजाचे गीत नवे गाऊ…
एक-एक दिवा जळेल,
अन भयभीत अंधारही होईल,
ज्योत पेटवू क्रमाक्रमाने,
लक्ख प्रकाश पेरत जाऊ,
तिमीरातून तेजाचे गीत नवे गाऊ…
काळीकुट्ट रात्रही वाट पाहते आहे,
निळ्या-मोकळ्या नभाच्या विरहाने झुरते आहे,
होऊ आपण काजवे,
सुक्ष्मातून जळत राहू…
तिमीरातून तेजाचे गीत नवे गाऊ…!!