मुक्तपीठ टीम
जगभरात कोरोनाने कहर केला आहे. देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधीतांचा आकडा वाढत चालला आहे. मागील तीन दिवसांत केरळमध्ये २० हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. केरळमध्ये एकूण २२,०६४ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशभरातील एकूण ४४,२३० रुग्णांच्या निम्मे रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. त्यामुळे केरळमधून देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
देशभरात २४ तासांत नव्या ४४,२३० कोरोना रुग्णांची नोंद झाली तर ४२,३६० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशभरात एकूण ४,०५,१५५ कोरोना रुग्णांचा आकडा समोर आला आहे. सलग तिसऱ्या दिवशी देशभरात कोरोना बाधितांची संख्या ४० हजारहून अधिक आहे. तसेच केरळमध्ये आज ४४ हजारहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. देशात आठवड्याचा पॉझिटिव्ह रेट ५ टक्के कमी असून १.२८ इतका आहे.
केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ४० हजारहून अधिक झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण झाले आहे. आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी येत्या शनिवार आणि रविवारी विकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊनचे नियम पाळण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी केरळमध्ये विकेंड लॉकडाऊनसाठी नियम व अटी जाहीर केल्या आहेत. मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, सामाजिक अंतराची अट मान्य करण्याचे आवाहन त्यांनी केरळवासियांना केले आहे. मागील काही दिवसांत कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालल्याने प्रत्येकाने नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.