मुक्तपीठ टीम
स्टेट बँकेत खातेधारक असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता स्टेट बँकेने एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे. जर ग्राहकांच्या खात्यात पुरेसा निधी नसेल आणि एटीएममधून पैसे काढत असतील तर आता अयशस्वी एटीएम व्यवहारासाठी दंड आकारण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.
खात्यात पुरेसे पैसे नसताना एटीएम वापर तर दंड
• स्टेट बँकेच्या खातेदारांच्या खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसेल आणि एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यास दंडाच्या स्वरूपात २० रुपये आणि जीएसटी वसूल करण्यात येणार आहे.
• तसेच बँकेकडून नॉन फायनेंशियल ट्राजेंक्शनसाठीही अधिकचा चार्ज लावला जाणार आहे.
या बँकेंमध्ये अधीपासूनच दंड
दरम्यान, पुरेशी रक्कम शिल्लक नसेल आणि एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यास दंड घेण्याचा नियम पुढील बँकांमध्ये आधीपासूनच आहे:
• आयसीआयसीआय
• एचडीएफसी
• येस बँक
• कोटक महिंद्रा
• अॅक्सिस बँक
स्टेट बँकेचे नवीन नियम काय आहेत?
• सध्या स्टेटकडून बचत खाते धारकांना एका महिन्यात एटीएममधून ८ वेळा विनामूल्य व्यवहार करण्याची मूदत देण्यात आली आहे.
• आपण स्टेटच्या एटीएममधून ५ आणि इतर बँकांच्या एटीएममधून ३ व्यवहार करू शकता.
• स्टेटच्या एटीएममधून १० हजार किंवा त्यापेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी ओटीपीची आवश्यकता लागते.
• आता ही सेवा बँकेच्या प्रत्येक एटीएमवर २४ तास उपलब्ध असणार आहे.
• ओटीपीची सेवा १ जानेवारी २०२० पासून सुरू करण्यात आली आहे.
• ओटीपी आधारित रोख रक्कम काढण्याची सुविधा सध्या केवळ स्टेट एटीएमवर उपलब्ध आहे. याचा फायदा आपण सकाळी ८ ते रात्री ८ या दरम्यान घेऊ शकता.
• खात्यात निधी नसतानाही एटीएमचा वापर केला तर मात्र दंड होईल