Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

वैचारिक दिवाळीची नवीन पहाट,  ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’चे युगपरिवर्तक नाटक ‘लोक-शास्त्र सावित्री’  

रविवार, ७ नोव्हेंबर रोजी, सकाळी ११.३० वाजता डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात

October 27, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
सावित्रीबाई फुले नाट्यगृहात

सायली पावसकर

सरकारचे कोरोना निर्बंध हटल्यानंतर आता कलाक्षेत्रात हालचाली सुरु झाल्या आहेत. नवी गतीमानता दिसून  येत आहे.  ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’  सात नोव्हेंबरला सकाळी साडे अकरा वाजता रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित-दिग्दर्शित युग परिवर्तक नाटक ” लोक – शास्त्र सावित्री ” प्रस्तुत करणार आहेत. हे नाटक दीपावलीच्या निमित्ताने विचारांचे नवरंग घेऊन डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात सादर होणार आहे.

  • कधी : 7 नोव्हेंबर 2021, रविवार रोजी, सकाळी 11.30 वाजता.
  • कुठे : सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली (पूर्व)
  • कलाकार: अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, सुरेखा साळुंखे, साक्षी खामकर, तुषार म्हस्के, स्वाती वाघ, संध्या बाविसकर,नृपाली जोशी, रूपवर्धिनी सस्ते.
  • वेळ : 70 मिनिटे
आज जग मशीनीकरणाच्या आणि तंत्रज्ञानी बाजारवादाच्या कचाट्यात अडकले आहे. मनुष्याची नैसर्गिक सहज वृत्ती नष्ट होऊन प्लास्टिक बनली आहे. नफा कमवायच्या आणि महासत्तांच्या वर्चस्ववादात, विचार – विकाराच्या द्वंद्वात अडकलेल्या या जगात माणुसकी वरील आता संकट शिगेला पोहोचले आहे. या विध्वंसाला प्रश्न विचारण्या ऐवजी आज वैचारिक रूपाने उध्वस्त झालेला समज त्याला विकास म्हणत आहे.
अशा प्रलयकाळात सांस्कृतिक सृजनकारच या जगाला वाचवू शकतील, जेव्हा संपूर्ण राजनैतिक व्यवस्था विकली गेलेली आहे. सत्य-असत्याच्या पुढे जाऊन आणि निरंतर खोटे पसरवून समाजाच्या मानसिकतेवर कब्जा करणाऱ्या विकारांपासून आज केवळ सांस्कृतिक सृजनकार मुक्ती देऊ शकतात. परंतु शोकांतिका आहे की, आज एकही सांस्कृतिक कर्मी जिवंत नाही , जो व्यवस्थेला भिडेल,याउलट पळवाटा शोधत आहे. सत्तेच्या अधीन होत आहेत. दृष्टिहीन, विचारहीन गर्दी होत चाललेल्या समाजाला कलात्मक दिशा देतो तो सृजनकार! सृजनकार मानवीय चेतना जागवत, समाजाला समग्र दृष्टी आणि सत्याचा मार्ग  दाखवतात.
आजच्या काळात कोण आहेत जे माणूस म्हणून जगतात ? सृजनकार म्हणून जगतात ? समाजाला घडवतात ?  सांस्कृतिक सृजनकार विवेकसंम्मत असतात. आपले विचार धैर्याने व्यक्त करताना मानवी कल्याणासाठी सत्याचा शोध घेतात.
असाच स्वतःच्या अस्तित्वाचा शोध सावित्रीबाई फुले आणि बहिणाबाईंनी घेतला होता. सावित्री बाईंनी  पितृसत्ता ,सामंतवाद, जातीवाद यांच्या वर्चस्ववादाला आव्हान दिले होते. सावित्रीबाई फुलेंनी अज्ञानाच्या फेऱ्यातून अखंड समाजाला बाहेर काढले. वर्षानुवर्षे चालत आलेल्या अनिष्ठ रुढींच्या गुलामीतून बाहेर  पडण्यासाठी समाजाला प्रेरित केले. सावित्रीबाईंनी आधुनिकतेचा बदल विचारांनी स्वीकारला होता.त्यांनी संघर्षाची मशाल हाती घेतली परंतु त्याची धग जनमानसाच्या मनात अजूनही धगधगते का ?
असं म्हंटल जातं कि माणूस शिक्षणाने माणूस होतो पण खरंच तसं घडतं का ? शिक्षण माणसाला न्यायसंगत करते का ? आणि जर तसं आहे तर मग बहिणाबाई कोण होत्या ? बहिणाबाई तर अशिक्षित राहूनही माणूस म्हणून जगल्या.
सावित्रीबाई आणि बहिणाबाई हे दोन ध्रुव आहेत. एक आहे विचार म्हणून अस्तित्व जागवण्याचं आणि दुसरे आहे जीवनदृष्टीने तत्व जगवण्याचे व या दोघांचा एकत्र येण्याचा बिंदू आहे माणुसकी !

“नाटक “लोक- शास्त्र सावित्री”

जनमानसात सावित्रीबाई फुलेंची ओळख आहे, त्यांचे नाव आहे परंतु त्यांचे तत्व रुजले नाही, आणि हे   तत्व रुजवण्याची प्रक्रिया “लोक- शास्त्र सावित्री” हे नाटक करते. सावित्री म्हणजे विचार !प्रत्येक व्यक्तीच्या मनात सावित्री जागी होते पण ती व्यवहाराच्या प्रहराने ती लोप पावते. प्रत्येकाच्या मनातील सावित्रीला चिन्हीत करण्यासाठी हे नाटक पुढाकार घेते.
सावित्रीने दिशा दाखवली परंतु आपण जागतिकीकरणाने रचलेल्या वाटेवर मार्गक्रमण करत आलो. सावित्रीच्या वाटेवर चालणे म्हणजे विचारांच्या वाटेवर चालणे जे आज अभावाने घडते.
भारताची जनता आणि भारतीय महिला या दोघांचेही निर्णय कोणीतरी दुसरं घेतं आणि ते  सहन करतात, शोषणाचे बळी पडतात पण त्याच्याविरुद्ध आवाज उठवत नाहीत. भारतात आज सावित्रीच्या पुढाकाराने शिकले,
पण सवित्री घडवू शकले नाहीत. कारण प्रश्न आहे रचनात्मक पुढाकाराचा, न्यायसंगत वागण्याचा, माणूस म्हणून जगण्याचा !  माझ्यासाठी पुढाकार कोण घेणार ? या मानसिकतेवर “लोक- शास्त्र सावित्री” हे नाटक वैचारिक प्रहार करते.
कला माणसात विवेक जागवते, माणसाला माणूस असण्याचा बोध करून देते. म्हणूनच सांस्कृतिक क्रांतीचे सृजनकार या भूमिकेला अंगीकारण्याची ही वेळ आहे. मानवतेसाठी व विश्वाच्या कल्याणासाठी  सृजन करणारा सृजनकार काळासोबत लढतो. आपला नवीन काळ निर्माण करतो. “थिएटर ऑफ रेलेवन्स” नाटयसिध्दांताचे  “लोक- शास्त्र सावित्री” हे नाटक युगपरिवर्ततनाचा काळ रचते.
परिवर्तनाच्या वाटेवर सांस्कृतिक सृजनकार मनुष्याला हिंसेपासून अहिंसेकडे, आत्महीनतेपासून आत्मबळाकडे, विकारांपासून विचारांकडे, वर्चस्ववादापासून समग्रतेकडे आणि व्यक्तीला सार्वभौमिकतेच्या प्राकृतिक न्याय आणि विविधतेचे सहअस्तित्व व विवेकाच्या दिशेने उत्प्रेरित करतात.

नाटक “लोक- शास्त्र सावित्री”  का ?

  • माणूस म्हणून जगण्यासाठी, न्यायसंगत समाज घडवण्यासाठी…स्वतःच्या आत सावित्री जागविण्यासाठी,सांस्कृतिक पुरोगामित्वाचा पाया रचण्यासाठी!
  • सांस्कृतिक चेतना ही सार्वभौम अधिसत्ता आहे.
  • सांस्कृतिक सृजनकाराच्या भूमिकेत “लोक-शास्त्र सावित्री” हे नाटक समाजाच्या चेतनेला व त्यांच्या मृतवत अवस्थेला पेटवून जागे करणारे आहे.
१८३१ पासून आतापर्यंतच्या काळाचा आलेख घेतला तर लक्षात येईल, त्या काळापासून सुरू झालेले सांस्कृतिक प्रबोधन जागतिकीकरणाने संपवले आहे. सावित्रीच्या प्रतिरोधाला प्रचारकी व्यक्तिवादाचे स्वरूप देऊन अलगदपणे सर्वसामान्य  केले.सावित्रीचा जो प्रतिरोध होता त्याची ताकद संपवली.आता हा प्रतिरोधाचा न्याय पताका घेऊन, “थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत” “लोक- शास्त्र सावित्री” या नाटकाच्या माध्यमातून पुन्हा सावित्रीच्या महत्वाला, तिच्या विचाराला जनमानसात जागवत आहे.

थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत

मागील 29 वर्षांपासून ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ या नाटय़ सिद्धांताने सतत कोणत्याही देशीविदेशी अनुदानाशिवाय आपली जबाबदारी आणि कर्तव्ये निभावली आहेत. प्रेक्षकांच्या सहभागाच्या आधारावर मुंबईपासून मणिपूरपर्यंत हे ‘रंग आंदोलन’ सुरू आहे. ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ने जीवनाला नाटकाशी जोडून मागील 29 वर्षांपासून जातीय मुद्दय़ावर ‘दूर से किसी ने आवाज़ दी’, बालमजुरीवर ‘मेरा बचपन’ अशी, कौटुंबिक हिंसेवर ‘द्वंद्व’, ‘मैं औरत हूँ’, लिंगनिदान या विषयावर नाटक ‘लाडली’, जैविक आणि भौगोलिक विविधतेवर ‘बी-7’ अशी नाटके रंगमंचावर आणली. मानवता आणि नैसर्गिक साधनसामग्रीच्या खासगीकरणाविरोधात ‘ड्रॉप बाय ड्रॉप : वॉटर’, मनुष्याला मनुष्य बनून राहण्यासाठी ‘गर्भ’, शेतकऱयांची आत्महत्या आणि शेतीच्या होणाऱया विनाशावर ‘किसानों का संघर्ष’, कलाकारांना कठपुतली बनवणाऱ्या आर्थिक तंत्रापासून कलाकारांच्या उन्मुक्ततेसाठी नाटक “अनहद नाद-अन हर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स”,
शोषण आणि दमनकारी पितृसत्तेच्या विरुद्ध न्याय, समता आणि समानतेची हुंकार देणारे ‘न्याय के भंवर में भंवरी’, समाजात राजनैतिक चेतना जागवण्यासाठी ‘राजगति’ अशा नाटकांच्या माध्यमातून फॅसिस्टवादी ताकदींशी ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ लढत आहे! आजच्या या कठीण काळात ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ने सांस्कृतिक सृजनकार घडवण्याचा निर्धार केला आहे! समाजाच्या मानसिकतेवर कब्जा करणाऱया मंडळींपासून आज केवळ सांस्कृतिक सृजनकार मुक्ती देऊ शकतात.

रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांच्याविषयी

लेखक – दिग्दर्शक “थिएटर ऑफ रेलेवेंस” नाट्य सिद्धांताचे सृजक आणि प्रयोगकर्ता मंजुल भारद्वाज असे रंगचिंतक आणि रंग आंदोलक आहेत, जे राष्ट्रीय आव्हानांना फक्त स्विकारत नाहीत तर आपला रंग विचार “थिएटर ऑफ रेलेवेंस” च्या माध्यमातून ते राष्ट्रीय उदिष्ट जन-माणसांसमोर ठेवतात. ह्या अभिजात लेखक – दिग्दर्शकाने आजतागायत 28 पेक्षा अधिक नाटकांचे लेखन दिग्दर्शन केले आहे. तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर थियेटर ऑफ रेलेवेंस सिद्धांताच्या माध्यमातून 1000 पेक्षा अधिक नाट्यकार्यशाळांचे संचालन केले आहे.

Tags: dombivalimuktpeethथिएटर ऑफ रेलेवन्सनवीन पहाटमुक्तपीठयुगपरिवर्तक नाटकलोक-शास्त्र सावित्रीवैचारिक दिवाळीसावित्रीबाई फुले नाट्यगृह
Previous Post

नवा मोटर वाहन कायदा…मोटर सायकलवर नऊ महिन्यांवरील मुलांनाही हॅल्मेट बंधनकारक! सेफ्टी बेल्टही पाहिजेच!

Next Post

राज्यात १४८५ नवे रुग्ण, २,५३६ रुग्ण बरे! मुंबईत पुन्हा चारशेपेक्षा जास्त!

Next Post
MCR 4-8-21

राज्यात १४८५ नवे रुग्ण, २,५३६ रुग्ण बरे! मुंबईत पुन्हा चारशेपेक्षा जास्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!