Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

‘थिएटर ऑफ रेलेवन्स’चा पनवेलमध्ये दोन दिवसीय वैचारिक नाट्य उत्सव

December 12, 2021
in घडलं-बिघडलं
0
थिएटर ऑफ रेलेवन्स

मुक्तपीठ टीम

जिथे समाज एका ‘फ्रोजन स्टेट’ मध्ये कुंठित झाला आहे. महामारीच्या काळात जिथे देश स्मशान आणि कब्रस्तान बनला आहे. बेरोजगारी, भूक आणि मृत्यू प्रत्येक क्षणाला तुमच्या चहू बाजूंनी घिरट्या घालत आहेत, अशा विध्वंसक काळात थिएटर ऑफ रेलेवन्सच्या सृजनकारांनी आपल्या नाटकांतून विचारांची ज्योत प्रज्वलित करत , मानवी विवेकाला जागृत केले आहे.
रंगभूमी पूर्णपणे बंद असताना देखील थिएटर ऑफ रेलेवंसच्या सृजनकारांनी ‘विध्वंसा’ समोर आपले गुढघे टेकले नाहीत परंतु स्वतःच्या  कलात्मक साधनेने विध्वंसाचा सामना केला. महामारीच्या व्यक्तिगत आक्रमणाचा सामना केला आणि आपल्या कलात्मक चैतन्याने भीतीचा पराभव केला. महिनोंमहिने चार भिंतीत कैद राहूनही, अभिनय, रंग संकल्पना, कलात्मक तरंगांना साधत  समाजाप्रती असणाऱ्या आपल्या रंगकर्माच्या दायित्वाला प्रखरतेने निभावले. या दरम्यान ‘लोक-शास्त्र सावित्री’ आणि ‘सम्राट अशोक’ ही दोन नवीन नाटके तयार केली आणि प्रेक्षकांसमोर त्याची प्रस्तुती करून समता, मानवता आणि संविधानाचा ध्वज फडकावला.
सम्राट अशोक लोक-शास्त्र सावित्री
३ जानेवारी २०२१ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी मुंबईतील उपनगर बदलापूर येथे ‘लोक-शास्त्र सावित्री’ या नाटकाची पहिली प्रस्तुती यशस्वी करत समतेच्या एल्गाराचा बिगुल फुंकला. नवं वर्षाच्या प्रकाशात प्रेक्षकांनी पहिल्या प्रस्तुतीला उचलून धरले आणि हे नाटक व्हायरल झाले. प्रेक्षक शोची मागणी करू लागले. कलाकार आपल्या या आनंदाला साजरा करून आत्मसात करणार इतक्यात, महामारीने मुख्य कलाकारावर हल्ला केला. या घटनेचा सर्व कलाकारांनी धसका घेतला पण ‘आव्हाना’ला धैर्याने सामोरे जायला तयार होते. कलाकारांनी एका मजबूत समूहाची व्याख्या रचली. मुख्य कलाकाराला सकारात्मक तरंगांनी ओतप्रोत केले आणि महामारी सोबत लढण्याची  इच्छाशक्ती आणि धैर्य दिले आणि पुढील प्रयोगाची प्रस्तुती केली. मुख्य कलाकार बरी होताच पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ‘लोक-शास्त्र सावित्री’ नाटकाचा प्रयोग झाला. हाऊसफुल्लची पाटी बॉक्स ऑफिसवर झळकली आणि या नाटकाने मराठी रंगभूमीचा वैचारिक झेंडा रोवला.
लोक-शास्त्र सावित्री
वैचारिकतेचा ध्वज घेऊन हे नाटक २७ मार्च २०२१ रोजी जागतिक रंगभूमी दिनी ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आले, आणि तिथे ही हाऊसफुल्लचा बोर्ड झळकला. मात्र सरकारने पुन्हा देश बंदची घोषणा करून नाट्यगृहांना टाळे ठोकले… थिएटर ऑफ रेलेवन्स च्या कलाकारांनी निराशेचे रूपांतर निरी + आशा मध्ये केले. चार भिंतीत कैद राहूनही आपल्या कलात्मक तरंगांतून चार भिंतीच्या चौकटीला तरंगीत केले आणि धनंजय कुमार लिखित ‘सम्राट अशोक’ या नाटकाला साधले.
 सम्राट अशोक
शारीरिक संकटाच्या वेळी स्वतःच्या शरीरावर काम केले आणि आपल्या शरीराला सम्राट अशोकाच्या भूमिकेसाठी योग्य बनवले आणि थिएटर बंद असताना देखील सरकारी नियमांचे पालन करून पनवेल जवळील तारा गावातील युसूफ मेहेरअली सेंटर मध्ये थिएटर ऑफ रेलेवंस नाट्य तत्वाच्या सुत्रपात दिवशी १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ५० प्रेक्षकांसमोर ‘सम्राट अशोक’ या नाटकाचा पहिला प्रयोग सादर करून भारतातील एका गावात संविधान संरक्षणाचा बिगुल फुंकला. थिएटर ऑफ रेलेवंसच्या कलाकारांनी आपल्या अद्भुत अभिनय आणि कलात्मक क्षमतेला वेळोवेळी नाटकाच्या तालमी व अन्य अनुभवांना सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजा समोर मांडले. नाटकाच्या तालमीला सतत सातत्याने सोशल मीडियावर शेअर करण्याचा हा एक अनोखा रंगपुढाकार थिएटर ऑफ रेलेवंसच्या कलाकारांनी घेतला. नाटकाच्या तयारीच्या प्रत्येक पैलू सोबत सोशल मीडियाचे व्युव्हर आत्ममग्न होऊन जगत होते. रंगभूमीवर वैचारिक नाटके चालत नाहीत, या भ्रमित अवधारणेला धारातीर्थी करत नाट्यगृह उघडताच ‘थिएटर ऑफ रेलेवंस’च्या रंगकर्मींनी आपली दोन्ही नाटके रंगभूमीवर उतरवली, आणि पुन्हा बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्लची पाटी लावत वैचारिक नाटकांचा झेंडा फडकावला.
रंगभूमीच्या वैचारिक प्रगतिशील नाटकांच्या समृद्ध वारसाचा ध्वज फडकवणारे कलाकार आहेत अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर,  सुरेखा साळुंखे, तुषार म्हस्के, स्वाती वाघ, संध्या बाविसकर, नृपाली जोशी, रूपवर्धिनी सस्ते, मोरेश्वर माने आणि  मंजुल भारद्वाज !
वैचारिक नाटक हाऊसफुल्ल होण्याचे रहस्य आहे ‘प्रेक्षक’ संवाद. हो, जागतिकीकरणाच्या खरेदी-विक्रीवाल्या खोट्या जाहिरातींच्या काळात थिएटर ऑफ रेलेवंसच्या कलाकारांनी प्रेक्षक संवाद करून प्रेक्षकांसमोर रंग नुमाईश आणि रंगकर्म यातील भेदाला स्पष्ट केले आणि समाजाच्या ‘फ्रोझन स्टेट’ ला तोडणतासाठी प्रेक्षकांच्या सहभागीतेला आणि सहयोगाला आपल्या नाटकांचा आधार बनवला. प्रेक्षकांनी आपला रचनात्मक प्रतिसाद दिला आणि आजच्या आव्हानात्मक काळात ‘वस्तू वा ग्राहक’ या रूपाला त्यागून देशाचे नागरिक असण्याच्या भूमिकेला निभावले. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे नाशिक मध्ये १ डिसेंबर २०२१ रोजी झालेली ‘लोक-शास्त्र सावित्री’ नाटकाची प्रस्तुती. सरकार द्वारे आयोजित साहित्य संमेलन आणि विपक्षाद्वारे आयोजित विद्रोही साहित्य संमेलन या मध्ये विभाजीत झालेल्या नाशिकला ‘लोक-शास्त्र सावित्री’ या नाटकाने एका सूत्रात बांधले. कलाकारांच्या या कलात्मक पुढाकाराला धोधो पावसात ही नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद देत नाट्यगृह हाऊसफुल्ल केले आणि वैचारिक नाटकाच्या यशाचा इतिहास रचला!
“थिएटर ऑफ रेलेवन्स” नाट्य सिद्धांताचे शुभचिंतक आणि प्रयोगकर्ते
आयोजित दोन दिवसीय वैचारिक नाट्य उत्सव
१८-१९ डिसेंबर, २०२१ वासुदेव बळवंत फडके नाटयगृह,पनवेल येथे करत आहेत.

१८ डिसेंबर,२०२१ ला सकाळी ११.३० वाजता
नाटक ‘सम्राट अशोक’
नाटककार – धनंजय कुमार
दिग्दर्शक व सम्राटच्या मुख्य भूमिकेत- मंजुल भारद्वाज

सम्राट अशोक

नाटक ‘सम्राट अशोक’
सम्राट च्या माणूस होण्यापासून एक आदर्श राजा होण्यापर्यंत ची कहाणी आहे. अशोक हा पहिला शासक होता, ज्याने धर्माला शासनावर हावी नाही होऊ दिले आणि सर्व धर्म समभाव साधत धर्मनिरपेक्ष शासनाचे उदाहरण विश्वासमोर ठेवले !  भारतीय संविधानाच्या मूळ तत्वाला वाचवण्याचा संकल्प आहे नाटक ‘सम्राट अशोक’ ।

 

१९ डिसेंबर,२०२१ ला सकाळी ११.३० वाजता
नाटक ‘लोक-शास्त्र सावित्री’
लेखक-दिग्दर्शक – मंजुल भारद्वाज

लोक-शास्त्र-सावित्री

नाटक ‘लोक-शास्त्र सावित्री’
समतेचा एल्गार आहे नाटक ‘लोक-शास्त्र सावित्री’.
सावित्रीबाई फुले यांनी अर्ध्या लोकसंख्येला ‘माणूस’ होण्याच्या प्राकृतिक हक्काचा बिगुल फुंकला. स्त्रीशिक्षणाची ज्योत पेटवून ‘गुलामी’च्या बेड्या तोडल्या.
समता, न्याय आणि मानवतेसाठी आयुष्यभर संघर्ष केला. आज देशात करोडो सुशिक्षित महिला आहेत पण एकही स्त्री ‘सावित्रीबाई फुले’ नाही झाली?
कलाकार : अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर,कोमल खामकर, सुरेखा साळुंखे, तुषार म्हस्के, स्वाती वाघ, संध्या बाविसकर,नृपाली जोशी, प्रियांका कांबळे,साक्षी आणि मोरेश्वर माने.


Tags: Lok Shashtri SavitriSamrat Ashokatheatre of relevanceथिएटर ऑफ रेलेवन्सलोक-शास्त्र सावित्रीसम्राट अशोक
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘ट्विटर’वर घुसखोरी! अकाउंट काही वेळ हॅक, बिटकॉइनबाबत ट्वीट!

Next Post

महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रस्तावित शक्ती कायदा प्रभावी ठरेल – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Next Post
Dr. Neelam Gorhe on Shakti Act

महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रस्तावित शक्ती कायदा प्रभावी ठरेल - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!