मुक्तपीठ टीम
श्रीनगरमधील एका मंदिराचे दरवाजे ३१ वर्षानंतर पुन्हा उघडले आहेत. येथे पुन्हा मंत्रांचे पठण करण्यात आले. हे मंदिर दहशतवादी कारवाया उफाळल्यापासून बंद होते. हब्बा कदल परिसरातील शितलनाथ मंदिरात भाविकांनी वसंत पंचमीला विशेष पूजा केली. मंदिर पुन्हा सुरू करण्यासाठी स्थानिक लोकांचा, त्याचबरोबर मुस्लिम समुदायाचेही पाठबळ मिळाले. येथे लोक पूजा करण्यासाठी येत असत, परंतु हे मंदिर दहशतवादामुळे बंद होते.
मुस्लिम समाजातील लोकांनीही या उपक्रमासाठी आवश्यक मदत केली. मंदिर स्वच्छ करण्यासाठी ते पुढे आले आणि पुजेच्या वस्तूही घेऊन आले. पूर्वी हिंदू भाविक दरवर्षी वसंत पंचमीला पूजा करत असत. बाबा शितलनाथ भैरव यांची जयंती वसंत पंचमीला येते, त्यामुळे हा दिवस धुमधडाक्यात साजरा केला जात असे. त्यामुळेच मंदिर पुन्हा उघडण्यासाठी वसंत पंचमीचाच मुहूर्त निवडण्यात आला.
पाहा व्हिडीओ: