नौदलाचं सामर्थ्य वाढवण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करत आहे. त्यासाठी स्वदेशी पाणबुड्यांचे वर्चस्व अधिक वाढवण्याचं सरकारनं मनावर घेतले आहे. नौदलासाठी सरकार साडेतीन लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नौदल पुढील दहा वर्षांत जहाजे आणि पाणबुडींसाठी ३.५ लाख कोटींपेक्षा जास्त खर्च करू शकणार आहे.
पुढे नाईक म्हणाले की, भारतीय नौदलाच्या ६० टक्क्यांपेक्षा जास्त अर्थसंकल्पीय तरतुदी भांडवली खर्चासाठी ठेवण्यात आल्या आहेत. या भांडवलाच्या अर्थसंकल्पातील ७० टक्के भाग देशातून खरेदीवर खर्च करण्यात आला आहे. अशाप्रकारे, गेल्या पाच वर्षांत देशांतर्गत अंदाजे ६६ हजार कोटी रुपयांची सामान्य स्तरावर खरेदी झाली आहे.
तसेच शेजारील देश आणि भौगोलिक राजकीय परिस्थिती लक्षात घेता समुद्रामध्ये देशाची सुरक्षा महत्त्वपूर्ण झाली. या कामात शिपयार्डची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. प्रत्येकाला मुंबईतील २६/११ हल्ल्या आठवणीत असेल. या हल्ल्यासाठी दहशतवादी सागरी मार्गावरून आले होते. नाईक म्हणाले की, आपला समुद्रकिनारा विशाल असून त्याची सुरक्षा तितकीच महत्त्वाची आहे.