मुक्तपीठ टीम
या वर्षी अनेक नवीन ऑटोमोबाईल कंपन्या भारतात आपली नव-नवी मॉडेल लाँच करत आहेत. अमेरिकन इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचं नुकतंच भारतात आगमन झालं आहे. त्यामागोमाग आता अमेरिकेतीलच दुसरी इलेक्ट्रिक कार मेकर कंपनी ट्रायटन देखील आपली इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. या वर्षातील ट्रायटनची इलेक्ट्रिक सेडान एन ४ ही कार लॉन्च होणार आहे. ती कार लुक आणि फीचर्सच्या बाबतीत जबरदस्त आहे.
ट्रायटनच्या या इलेक्ट्रिक कारमध्ये मोठी पावरफुल बॅटरी आहे. तिची रेंज ५०० ते ७०० किलोमीटर दरम्यान आहे. ट्रायटनने भारतात विस्तारित योजना आखल्या आहेत आणि याबाबत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडशीही चर्चा केली आहे.
ट्रायटन भारतामध्ये इलेक्ट्रिक सेडन ट्रायटन एन ४ ईव्ही कारची सुरूवातीला ३५ लाख रुपये किंमतीत लॉन्च करणार आहे. ही इलेक्ट्रिक कार ट्रायटन एन ४, ट्रायटन एन ४-एस, ट्रायटन एन ४-आर आणि लिमिटेड एडिशन ट्रायटन एन४ जीटी अशा विविध प्रकारात लॉन्च करणार आहे.
ट्रायटन एन ४ ची बॅटरी आणि पॉवर जबरदस्त आहे. त्यामध्ये ७५ किलोवॅट क्षमतेपासून १०० किलोवॅट क्षमतेपर्यंत बॅटरी आहे. सिंगल चार्जवर ही कार ५२३ किलोमीटरपासून ६९३ किलोमीटर पर्यंत धावते. ट्रायटन इलेक्ट्रिक व्हेइकलचे फाउंडर आणि सीईओ हिमांश बी. पटेल म्हणाले की, ते भारतामध्ये इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यासाठी खूप आतुर आहे.
पाहा व्हिडीओ :