मुक्तपीठ टीम
जगात कुठेही घडलं नाही ते आपल्या भारतात घडले आहे. आपल्या शहरातील विमानसेवा सुरुच ठेवण्यासाठी स्थानिक नागरिक एकवटले. त्यांनी विमान कंपनीशी तोटा भरून देण्याचा करार केला आणि शहराचा हवाई संपर्क अबाधित ठेवला. अर्थात त्यामुळे शहराचा फायदाही कायम राहिला.
जगात घडले नाही ते राजस्थानमधील जैसलमेरमध्ये घडले आहे. जैसलमेरमधील पर्यटन व्यावसायाला चालना देण्यासाठी एक अशी मोहिम राबविण्यात येत आहे, जी देशभरात आणि जगातील पहिली मोहिम असेल. येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी विमान सेवा सुरु राहिली पाहिजे, यासाठी या शहरातील व्यापारी आणि हॉटेल व्यवसायिक नागरिक स्वत:च्या पैशातून खर्च करण्यास तयार आहेत.
विमान सेवा सुरु करण्यासाठी जैसलमेरकर व्यावसायिकांनी घेतलेल्या पुढाकारामुळे विमानसेवा पुन्हा सुरु होईल १२ फेब्रुवारीपासून जैसलमेरची दिल्ली आणि अहमदाबादची स्पाइसजेटची विमाने प्रवाशांसाठी उपलब्ध असतील. जर या सेवेत एअरलाइन्सचे नुकसान झाले तर शहरातील व्यावसायिक नुकसान भरून देतील. स्पाइसजेटने तोट्यामुळे २८ जानेवारीपासून जैसलमेरची उड्डाणे थांबविली होती.
जैसलमेरचे जिल्हाधिकारी आशिष मोदी यांच्या प्रयत्नांमुळे व्यापारी आणि स्पाइसजेट यांच्यात लेखी करार झाला. त्याअंतर्गत स्पाइसजेट दर १५ दिवसांनी बुकिंगची माहिती देईल. जर कंपनीचे नुकसान झाले तर पर्यटनाशी संबंधित व्यापारी नुकसान भरपाई भरतील. सध्या १३ मार्चपर्यंत सामंजस्य करार झाला आहे.
आठवड्यातील ३ दिवस दिल्ली आणि अहमदाबाद येथे ३ दिवस उड्डाणे आहेत. दिल्लीत सोमवारी, बुधवार आणि शुक्रवारी असेल, तर अहमदाबादला मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी उड्डाणे होतील. स्पाइसजेटने दिल्लीकडे जाण्यासाठी प्रत्येक उड्डाणासाठी ६ लाख रुपये आणि अहमदाबादला जाणाऱ्या उड्डाणांसाठी १ लाख रुपये खर्चाचा अंदाज सादर केला आहे.
एखादी विमान कंपनी आणि स्थानिक नागरिक एकत्र येऊन विमान सेवा चालवतील अशी ही पहिलीच वेळ आहे. प्रत्येकाने पर्यटनाला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जर स्पाइसजेटला फायदा झाला तर तो त्यांचा असेल पण जर तोटा झाला तर तो व्यावसायिक भरून देतील.
पाहा व्हिडीओ: