मुक्तपीठ टीम
कोरोना साथीनंतर औरंगाबादमध्ये पहिल्यांदा मुत्रपिंडाचे प्रत्यारोपन करण्यात आले आहे. औरंगाबाद कमलनयन बजाज हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी एका तरुणाचे मुत्रपिंड प्रत्यारोपण केले. त्याला त्याच्या आईने मुत्रपिंड देउन जीवनदान दिले आहे. दोघांच्याही शरीरात कोरोना अॅन्टीबॉडीज असल्याचेही तपासणीत आढळले आहे.
मुत्रपिंड प्रत्यारोपणामुळे नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील २६ वर्षीय तरुणाला जीवनदान मिळाले. या मुलाला मुत्रपिंड त्याच्या जन्मदात्या आईने दिले आहे. या दोघांना काही महिन्यांपूर्वी सौम्य ताप आला होता. परंतु त्यांनी कोरोनाची चाचणी केली नव्हती.
नेफरोलॉजिस्ट समीर महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण जवळजवळ दीड वर्ष डायलिसिसवर असल्यामुळे प्रत्यारोपण करणे गरजेचं होतं. मात्र, कोरोनाच्या साथीमुळे या तरुणाचे प्रत्यारोपन करायला उशिर झाला होता.
रुग्ण आणि त्याच्या आईच्या शरीरात कोरोना अँटीबॉडीज आहेत, असे आढळले. इतर रुग्णांच्या बाबतीत डॉक्टरांनी मुत्रपिंड प्रत्यारोपण करण्याचे पुढे ढकलले होते, पण नाशिकमधील तरुण काही महिन्यांपासून डायलिसिसवर असल्याने त्याचे प्रत्यारोपन लवकर करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. या मुलाची आई गृहिणी आहे. त्या तरुणाचे २१ जानेवारी रोजी मुत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले होते. आता त्याची प्रकृती सुदृढ आहे.
पाहा व्हिडीओ:
सर…तुमची बातमीपञ खूपच छान असतात..नियमित वाचत असतो.आमच्या तुलक्यातील बातम्या पाठविल्या तर चालेल का…!
नक्की पाठवा ७०२११४८०७०, ९८३३७९४९६१