Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home चांगल्या बातम्या सरकारी बातम्या

मराठा आरक्षण उपसमितीने घेतला सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या तयारीचा आढावा

February 24, 2021
in सरकारी बातम्या
0
maratha reservation

मुक्तपीठ टीम

येत्या ८ मार्चपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू होणाऱ्या एसईबीसी आरक्षणाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमिवर राज्य शासनाच्या मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ समितीने आज बैठक घेतली. उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत या सुनावणीच्या तयारीच्या आढाव्यासह मराठा समाजाच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाली.

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीला उपसमितीचे सदस्य तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, मराठा आरक्षण प्रकरणातील विशेष विधीज्ञ विजयसिंह थोरात, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, राज्य शासनाचे वकिल अॅड. सचिन पाटील, अॅड. राहुल चिटणीस, तसेच राज्य शासनाने नेमलेल्या वकिलांच्या समन्वय समितीचे सदस्य अॅड. आशिष गायकवाड, अॅड. राजेश टेकाळे, अॅड. रमेश दुबे पाटील, अॅड. अनिल गोलेगावकर, अॅड. अभिजीत पाटील आदी उपस्थित होते.

येत्या ८ मार्चपासून सुरू होणाऱ्या सुनावणीबाबत सर्व मुद्यांची आजच्या बैठकीत समिक्षा करण्यात आली. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी केंद्र सरकारकडून अपेक्षित असलेल्या सहकार्यावर विचारविनिमय झाला व राज्याची भूमिका पुन्हा एकदा केंद्राला कळविण्याचे निश्चित करण्यात आले. याशिवाय मराठा समाजाच्या इतरही प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली.

या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण म्हणाले की, देशातील अनेक राज्यांमधून त्यांच्या आरक्षणाचे प्रकरण मराठा आरक्षणाच्या प्रकरणाशी जोडावे, अशी मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या आहेत. मराठा आरक्षणाचे प्रकरण ईडब्ल्यूएस तसेच इतर राज्यांच्या आरक्षण प्रकरणाशी जोडावे, ही राज्य सरकारची देखील भूमिका असून, तशी विनंती सर्वोच्च न्यायालयात यापूर्वीच करण्यात आली आहे. मराठा आरक्षण प्रकरणामध्ये इंद्रा साहनी निवाड्याचा संदर्भ असल्याने ही सुनावणी नऊ किंवा अकरा न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे व्हावी, अशी राज्य शासनाची अपेक्षा आहे.

Tags: अशोक चव्हाणअॅड. अनिल गोलेगावकरअॅड. अभिजीत पाटीलअॅड. आशिष गायकवाडअॅड. रमेश दुबे पाटीलअॅड. राजेश टेकाळेअॅड. राहुल चिटणीसअॅड. सचिन पाटीलमराठा आरक्षण
Previous Post

विद्यार्थ्यांवर गो-विज्ञान परीक्षा लादणारे कामधेनू आयोगाचे अध्यक्ष निवृत्त, परीक्षा टळली!

Next Post

क्रीडा थोडक्यात: १) मार्च महिन्यात होणाऱ्या विश्व बीच व्हॉलिबॉल स्पर्धेवर जर्मनीच्या महिला संघाने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. बीच व्हॉलिबॉलमध्ये महिला खेळाडू बिकिनी घालतात. बिकिनी घालण्यास मनाई केल्यामुळे बीच व्हॉलिबॉल स्टार कार्ल बॉर्गर आणि ज्युलिया स्यूड यांनी स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. कतार हा एकमेव असा देश आहे, जिथे खेळाडूंना कोर्टवर बिकिनी घालण्यास मनाई आहे, असे या दोघींचे मत आहे. २) मोटेरा स्टेडियममध्ये पूर्णपणे फिरकीला अनुकूल खेळपट्टीची आशा बाळगण्यात येत आहे; पण भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या मते, इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या दिवस-रात्र कसोटीत वेगवान गोलंदाजांची भूमिकाही फिरकीपटूंप्रमाणेच महत्त्वाची असेल. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत उभय संघ १-१ ने बरोबरीत आहे आणि बुधवारपासून येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीपूर्वी नव्याने तयार करण्यात आलेल्या स्टेडियमची नवी खेळपट्टी चर्चेचा केंद्रबिंटू ठरली आहे. ३) कर्णधार श्रेयस अय्यरने (९९ चेंडूंत नाबाद १०३ धावा) साकारलेले दिमाखदार शतक आणि अनुभवी धवल कुलकर्णीच्या (५/४४) भेदक गोलंदाजीमुळे मुंबईने विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी महाराष्ट्राचा सहा गडी आणि १६ चेंडू राखून सहज धुव्वा उडवला. जयपूरच्या के. एल. सैनी मैदानावर झालेल्या ‘ड’ गटातील या सामन्यात महाराष्ट्राने दिलेले २८० धावांचे लक्ष्य मुंबईने ४७.२ षटकांत चार फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले. सलग दुसऱ्या विजयामुळे मुंबईने आठ गुणांसह गटात अग्रस्थान मिळवले आहे. ४) इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ डे-नाइट कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना भारताचा जलद गोलंदाज इशांत शर्मासाठी खास ठरणार आहे. कारण तो त्याचा १००वा कसोटी सामना आहे. या शिवाय भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीलाही एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर करण्याची संधी आहे. मोटेरा मैदानावर होणाऱ्या कसोटीत विजय मिळवल्यास कर्णधार म्हणून विराटने मिळवलेला २२वा विजय असेल. सध्या भारतात कसोटीत सर्वाधिक २१ विजयाचा विक्रम धोनीच्या नावावर आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!