मुक्तपीठ टीम
लोकप्रिय अभिनेते-कॉमेडियन राजू श्रीवास्तव सध्या एम्समध्ये मृत्यूशी लढा देत आहेत. राजू श्रीवास्तव (५८) यांना १० ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) च्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. त्यांना व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला त्याच दिवशी त्यांची अँजिओप्लास्टी झाली. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती आणखी बिघडली. त्यांचा मेंदू मृत अवस्थेत आहे म्हणजेच ते ब्रेन डेड आहेत. गेल्या ९ दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्या पत्नीने ते सध्याच्या संकटातून नक्की बाहेर येतील, असा प्रबळ आशावाद व्यक्त केला आहे.
राजू श्रीवास्तव यांची रिक्षाचालक म्हणून सुरुवात…
- राजू श्रीवास्तव यांचा जन्म २५ डिसेंबर १९६३ रोजी कानपूर येथे झाला.
- राजू श्रीवास्तव मायानगरीत मुंबईत आले.
- मात्र सुरुवातीच्या काळात त्यांना खूप संघर्ष करावा लागला.
- त्याच्याकडे पैशांची कमतरता होती आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्याला सुरुवातीच्या दिवसांत ऑटो रिक्षाही चालवली.
- ऑटो चालवतानाही ते आपलं लक्ष्य विसरले नाहीत. त्यांनी कॉमेडी सुरुच ठेवली.
- ऑटो चालवत असताना अचानक त्यांच्या नशिबाने वळण घेतले आणि त्यांना एका कॉमेडी शोमधून बोलावण्यात आले.
- तिथून राजू श्रीवास्तवचे आयुष्य बदलले.
- त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
- त्याला डीडी नॅशनल वाहिनीवर शो करण्याची संधी मिळाली.
- त्यानंतर त्याने ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमध्ये भाग घेतला आणि तो उपविजेता ठरला.
- तेथेच त्यांना ओळख देणाऱ्या गजोधर भैय्याचा जन्म झाला.
एका शोला फक्त ५० रुपये!
राजू श्रीवास्तव यांना सुरुवातीच्या काळात मुंबईत खूप संघर्ष करावा लागला. एक शो करण्यासाठी त्यांना फक्त 50 रुपये मिळायचे. त्या काळात विनोदी कलाकारांना फारशी मागणी नव्हती. राजू श्रीवास्तव यांनी सांगितले होते की, त्यांना फक्त जॉनी लिव्हरकडे पाहून प्रेरणा मिळत असे. एक दिवस आपले आयुष्य बदलेल, अशी खात्री वाटत असे.
राजू श्रीवास्तव मोठ्या पडद्यावरही…
राजू श्रीवास्तव यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले.
- १९८८ मध्ये त्यांनी तेजाबमध्ये पहिल्यांदा काम केले.
- १९९१ मध्ये मैं ने प्यार किया
- १९९३ मध्ये बाजीगर आणि मिस्टर आझाद
- १९९४ मध्ये अभय,
- २००१ मध्ये आमदनी अठन्नी खर्चा रुपइया
- २००२ मध्ये वाह! तेरा क्या कहना
- २००३ मध्ये मैं प्रेम की दीवानी हूं
- २००६ मध्ये विद्यार्थी: द पॉवर ऑफ स्टुडंट्स
- २००७ मध्ये बिग ब्रदर अँड बॉम्बे टू गोवा
- २०१० मध्ये भावनाओं को समझो और बारूद: द फायर – अ लव स्टोरी’
- २०१७ शेवटचा चित्रपट टॉयलेट: एक प्रेम कथा
राजू श्रीवास्तव राजकारणातही!
- अभिनयासोबतच राजू श्रीवास्तव यांनी राजकारणातही प्रवेश केला.
- २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना समाजवादीने कानपूरमधून रिंगणात उतरवले होते.
- मात्र पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून पुरेसा पाठिंबा मिळत नसल्याने त्यांनी तिकीट परत केले.
- १९ मार्च २०१४ रोजी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना स्वच्छ भारत अभियानात सहभागी केले.
- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांची यूपी फिल्म विकास परिषदेच्या अध्यक्षपदी निवड केली.