मुक्तपीठ टीम
बिहारच्या जेहानाबाद येथे शनिवारी राष्ट्रीय लोक न्यायालय आयोजित करण्यात आले होते. एका न्यायमूर्तींनी तेथे मानवतेचे जबरदस्त उदाहरण मांडले. बँकेचे कर्ज फेडण्यासाठी लोक न्यायालयामध्ये आलेला शेतकरी ढसाढसा रडू लागला. प्रत्यक्षात शेतकऱ्याची अवस्था पाहून न्यायाधीशांनी स्वत:च्या खिशातून बँकेला कर्जाची रक्कम परत केली व शेतकऱ्याच कर्ज फेडलं. त्यांची ही दानशीलता चर्चेत आली आहे. डॉ. राकेश कुमार सिंग, जिल्हा न्यायाधीश, जहानाबाद, बिहार यांनी लोक न्यायालयामध्ये पोहोचलेल्या वृद्ध शेतकरी राजेंद्र तिवारी यांच्या कर्जावरील व्याज तर माफ केलेच, पण कर्जदाराला कर्जमुक्तही केले.
नेमक प्रकरण काय?
- राजेंद्र तिवारी यांना बँकेकडून कर्जाची परतफेड करण्यासाठी वारंवार नोटिसा देण्यात आल्या होत्या.
- शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये त्यांना नोटीस पाठवून पुन्हा बोलावण्यात आले होते.
- राजेंद्र तिवारी लोक न्यायालयामध्ये पोहोचले.
- त्यांच्याकडे फक्त ५ रुपये होते.
- कर्जाची रक्कम ३६,००० रुपयांपेक्षा जास्त होती.
- यापेक्षा जास्त पैसे आणू शकत नाही, असे राजेंद्र तिवारी यांनी खंडपीठाला सांगितले.
- त्यावेळी न्यायाधीशांनी स्वत: पैसे भरुन राजेंद्र तिवारी यांच्यावरील कर्जमुक्त केले.
जितके कर्ज तितके जास्त व्याज!
- वृद्ध शेतकरी राजेंद्र तिवारी यांनी किसान क्रेडिट कार्डवर १८ हजारांचे कर्ज घेतले होते.
- राजेंद्र तिवारी यांच्या मुलीच्या लग्नात ही रक्कम खर्च करण्यात आली.
- शेती व्यवस्थित न केल्याने कर्जाची परतफेड करता आली नाही आणि १८,००० ची रक्कम व्याजासह ३६,६७५ रुपये झाली.
एका सामाजिक कार्यकर्त्याने मदत करुनही कर्ज फेडण्यात अपयश…
- एका सामाजिक कार्यकर्त्याने त्यांना ३००० रुपयांची मदत केली.
- हे सुध्दा कामी आले नाही.
- व्याज माफ करण्याची विनंती त्यांनी बँक व्यवस्थापकाकडे केली.
- तरीही १८,६७५ रुपये कर्जाची रक्कम शिल्लक होती.
- बँक व्यवस्थापक यापेक्षा कमी करायला तयार नव्हते.
- परिस्थिती पाहता जिल्हा न्यायाधीश राकेश कुमार सिंह यांनी पुढे जाऊन कर्जाची उर्वरित रक्कम वृद्ध शेतकऱ्याच्या खिशातून जमा केली.