मुक्तपीठ टीम
आजवर जी सुविधा नव्हती ती सुविधा आता उपलब्ध होणार आहे. आता दुर्मिळ आजारांवरील उपचारांसाठी केंद्र सरकारकडून मोठी मदत मिळणार आहे. राष्ट्रीय आरोग्य निधी योजनेंतर्गत अशा दुर्मिळ आजारांच्या उपचारासाठी २० लाखांपर्यंतचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दुर्मिळ आजारांसाठीच्या राष्ट्रीय धोरणाला मंजुरी दिली आहे. या नव्या धोरणाचा उद्देश स्वदेशी संशोधन आणि औषधांच्या स्थानिक उत्पादनावर अधिक लक्ष केंद्रित करणे हा आहे. तसेच दुर्मिळ आजारग्रस्तांना उपचारासाठी थेट मदत करणेही आहे.
या आर्थिक सहाय्याचे लाभार्थी केवळ बीपीएल कुटुंबियांपर्यंत मर्यादित राहणार नाही, तर हा लाभ पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र असलेल्यांमधील ४० टक्के लोकांना देण्यात येईल. राष्ट्रीय आरोग्य निधी म्हणजेच आरएएन योजनेत हे सहाय्य प्रस्तावित आहे.
याव्यतिरिक्त, या धोरणात क्राऊड फंडिंगची व्यवस्थादेखील केली गेली आहे ज्यात कॉर्पोरेट्स आणि इतर लोकांना दुर्मिळ आजारांच्या उपचारांसाठी आयटी प्लॅटफॉर्मद्वारे आर्थिक सहाय्य करण्यास प्रोत्साहित केले जाईल.
पाहा व्हिडीओ: