मुक्तपीठ टीम
डीआरडीओ आणि भारतीय लष्कराने संयुक्तपणे देशाची पहिली स्वदेश निर्मित 9 एमएम मशीन पिस्तूल विकसित केले आहे. इन्फंट्री स्कूल, महू आणि डीआरडीओच्या शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्था(एआरडीई), पुणे यांनी हे पिस्तूल विकसित केले आहे. चार महिन्यांच्या विक्रमी वेळेत हे शस्त्र विकसित केले गेले आहे. मशीन पिस्तूल 9 एमएम गोळीबार करते. मेटल थ्रीडी प्रिंटिंगच्या सहाय्याने बनविलेल्या ट्रिगर घटकांसह विविध भागांच्या डिझाइनिंग आणि नमुन्यामध्ये थ्रीडी प्रिंटिंग प्रक्रिया वापरली आहे.’
डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच डीआरडीओने सध्या लष्करी उपयोगी शोधांचा धडाका लावला आहे. आता देशातील पहिले स्वदेशी मशीन पिस्तूल एएसएमआय तयार केले आहे. सैन्याने हे मशीन पिस्तूल नुकतेच सर्वांसमोर आणले. हे पिस्तूल संरक्षण दलाच्या ९ मिमी पिस्तूलच्या जागी वापरले जाऊ शकते.
या मशीन पिस्तूलची फायर रेंज १०० मीटरपर्यंत आहे. इस्राईलच्या यूजी सीरीजच्या तोफांच्या पार्श्वभूमीवर याची रचना केली गेली आहे. सैन्याने या प्रोटोटाइप पिस्तूलमधून ३००हून अधिक राउंड फायर केले आहेत. हे ४ महिन्यांपूर्वी तयार केले गेले होते.
India’s first indigenous 9mm Machine Pistol has been jointly developed by DRDO and Indian Army. https://t.co/5NoUgQWrWW
— DRDO (@DRDO_India) January 14, 2021
सशस्त्र दलातील कमांडर्स आणि रणगाडे आणि विमानात तैनात असलेल्या क्रू मेंबर्ससाठी वैयक्तिक शस्त्रे म्हणून या पिस्तूलचा चांगला उपयोग होईल. केंद्रीय आणि राज्य पोलिस संघटना तसेच व्हीआयपी संरक्षण आणि गस्त यामध्ये या पिस्तुलाचा वापर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. मशीन पिस्तूलाची उत्पादन किंमत प्रत्येकी 50,000 रुपयांपेक्षा कमी असून याची निर्यात होण्याची देखील शक्यता आहे.
पिस्तूलाचे नाव “अस्मि” असे ठेवण्यात आले आहे अस्मि म्हणजे “गर्व”, “स्वाभिमान” आणि “कठोर परिश्रम”.
पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीकोनाला अनुसरून स्वालंबनाच्या दिशेने टाकलेले हे एक छोटे पाऊल आहे आणि सेवा आणि निमलष्करी दल (पीएमएफ) यामध्ये लवकरच याचा समावेश होईल अशी अपेक्षा आहे.
पाहा व्हिडीओ :