द्राक्ष निर्यातीचा हंगाम सुरू झाला आहे. नाशिक जिल्ह्यातून द्राक्षाचा १२ मॅट्रिक टन वजनाचा पहिला कंटेनर जर्मनीला रवाना झाला आहे. या जिल्ह्यात डिसेंबर ते एप्रिल या हंगामात २०१९-२०२० मध्ये १ लाख २० हजार टन द्राक्षाची निर्यात झाली होती. त्याआधीच्या वर्षात नाशिकने सुमारे १ लाख ४ हजार टन द्राक्ष निर्यात केली होती. राज्याच्या कृषी विभागाकडे नोंद असलेल्या द्राक्षाच्या मळ्यांचे प्रमाण वाढले आहे. शासकीय निकषानुसार द्राक्ष निर्यात करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्षाच्या मळ्यांची नोंद राज्य कृषी विभागात करावी लागते. २०२०-२१ च्या द्राक्ष हंगामासाठी सुमारे, ३७ हजार ९० द्राक्ष उत्पादकांनी २२ हजार ७८० हेक्टर क्षेत्र नोंदवले आहेत.
द्राक्ष हे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे फळ आहे. कृषीमाल निर्यात करताना प्रत्येक देशाच्या द्राक्षाचा आकार, द्राक्षाच्या घडाचे वजन, साखरेचे प्रमाण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कीटकनाशकांचा अंश असे काही निकष आहेत. त्यांचे पालन करत भारतीय द्राक्षांनी परदेशात आपली ओळख निर्माण केली आहे. पोषक हवामानामुळे यंदा दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन वाढणार आहे. जानेवारीपासून द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे. या वेळी ४५ हजांराहून अधिक उत्पादकांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे.
लिंक क्लिक करा, पाहा व्हिडीओ: