मुक्तपीठ टीम
ठाणे जिल्ह्यातील अंबाडी जवळील दिघाशी येशील रंगपंचमीला भरणारी गावदेवी यात्रा ही पंचक्रोशीतील भरणारी सर्वात मोठी यात्रा आहे. यावर्षी कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. गावदेवी यात्रेला अनेक पूर्ण गावात गावदेवी मातेची मिरवणूक काढली जाते. या यात्रेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे पाच रात्री २५ सोंगं नाचतात. अखेरीस देवी आणि म्हैसासूर यु्द्ध होते. दिवसा गावदेवी मातेची मिरवणूक निघते.
दिघाशी येथील गावदेवी यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा आहे. रात्री अनेक सोंगे नाचवत या पालखी सोहळ्याला सुरवात होते. जवळपास पूर्ण रात्रभर सूत्रधार, गणपती, सरस्वती, दशरथ राजा, राम , हिरण्यकश्यप, आगीरतन, हनुमंत यांच्यासह जवळपास २५ पात्रे(सोंगे) नाचवली जातात. विशेष म्हणजे गावदेवी मातेचे पात्र घेणारी व्यक्ती ही महिला नसून एक पुरुष असतात. गावदेवी मातेची भूमिका साकारणारा भक्त व्यक्ती काहीच न खाता फक्त दुधावर जवळपास ५ दिवस काढत असते. त्यानंतर सर्वात शेवटी गावदेवी आणि म्हैसासूर यांच्यात युद्ध होऊन या पालखीची सांगता होते. त्यांनतर दुसऱ्या दिवशी गावदेवी मातेची पूर्ण गावात मिरवणूक काढली जाते
गावदेवी यात्रेच्या काही रंजक गोष्टी…
देवीकडे काही मागितले की ती मनोकामना पूर्ण करते. त्यामुळे ठाणे, पालघर जिल्ह्यातील अनेक भक्त या यात्रेला येत असतात.