Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

क्षेपणास्त्र युद्धनौकेवरील ‘२२ वी किलर स्क्वॉड्रन्स’ तुकडीला प्रेसिडेंट’स स्टॅंडर्ड विशेष सन्मान प्रदान केला जाणार

December 6, 2021
in घडलं-बिघडलं, विशेष, सरकारी बातम्या
0
PRESIDENT’S STANDARD

मुक्तपीठ टीम

नौदल कवायतीद्वारे २२ वी क्षेपणास्त्र युद्धनौकेवरील तुकडी, (वेसल स्क्वॉड्रन, जिला किलर स्क्वॉड्रन म्हणूनही ओळखले जाते, अशा नौदल तुकडीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते, मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे ०८ डिसेंबर २१ रोजी प्रेसिडेंट’स स्टॅंडर्ड हा सन्मान समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे. या समारंभाच्या गौरवार्थ एका टपाल तिकिटासह, एक विशेष कव्हर देखील टपाल विभागाद्वारे प्रकाशित केले जाईल.

KillerSquadron1LMRD

या समारंभाला महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि नौदल विभागप्रमुख तसेच इतर अनेक नागरी आणि लष्करातील मान्यवर अधिकारी उपस्थित राहतील. राष्ट्रासाठी केलेल्या सेवाकार्यासाठी सर्वोच्च अधिका-यांनी लष्करी तुकडीला दिलेला सर्वोच्च सन्मान म्हणजे प्रेसिडेंट’स स्टॅंडर्ड पुरस्कार. दिनांक २७ मे १९५१ रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते भारतीय नौदलाला प्रेसिडेंट कलर्स म्हणजेच ‘राष्ट्रपती ध्वज’ हा सन्मान प्रदान करण्यात आला होता. प्रेसिडेंट स्टँडर्ड हा सन्मानही प्रेसिडेंट कलर्सच्याच पातळीचा असून तो तुलनेने लहान लष्करी तुकडीला किंवा समूहाला दिला जातो.

KillerSquadron25M2M

क्षेपणास्त्र युद्धनौकेवरील २२ व्या तुकडीची औपचारिक स्थापना ऑक्टोबर १९९१ मध्ये मुंबईत दहा वीर श्रेणी आणि तीन प्रबळ श्रेणीच्या क्षेपणास्त्र नौकांसह करण्यात आली होती. तथापि, ‘किलर्स’ चा उदय १९६९ पासूनचा आहे . भारतीय नौदलाची ताकद वाढवण्यासाठी तेव्हाच्या USSR (युनायटेड सॉव्हरेन स्टेट्स ऑफ रशिया) मधून OSA I या श्रेणीच्या क्षेपणास्त्र नौकांचा समावेश करण्यात आला आहे. या क्षेपणास्त्र नौका मोठे वजन वाहू शकणाऱ्या व्यावसायिक जहाजांवरुन भारतात आणल्या गेल्या आणि १९७१ च्या सुरुवातीस कोलकाता येथे तैनात करण्यात आल्या. १९७१ च्या भारत-पाक युद्धादरम्यान त्यांची अग्नीपरीक्षा झाली. या युद्धात त्यांनी परिणामकारक आणि निर्णायक भूमिका बजावली.

KillerSquadron7DPLI

०४-०५ डिसेंबर १९७१ च्या रात्री, भारतीय नौदलातील सर्वात तरुण योद्धांनी पाकिस्तानच्या नौदलावर विनाशकारी आक्रमण केले. भारतीय नौदलाची जहाजे निर्घाट, निपत आणि वीर यांनी त्यांची स्टाईक्स ही युद्धनौका रोधी क्षेपणास्त्रे डागली आणि पाकिस्तान नौदलाची खैबर आणि मुहाफिझ ही जहाजे बुडवली, ज्यामुळे पाकिस्तानच्या नौदलाच्या आकांक्षांना प्राणघातक धक्का बसला आणि पुढील अनेक वर्षे ते कोलमडलेलेच राहिले. ऑपरेशन ट्रायडंट असे सांकेतिक नाव असलेले, हे ऑपरेशन नौदलाच्या आधुनिक इतिहासातील सर्वात यशस्वी ऑपरेशन्सपैकी एक मानले जाते, ज्यामध्ये भारतीय सैन्याची कोणतीही जीवितहानी झाली नाही. अथक परीश्रम करणाऱ्या भारतीय नौदलाने दिनांक ८/९ डिसेंबरच्या रात्री आणखी एक धाडसी हल्ला केला, जेव्हा INS विनाशने दोन फ्रिगेट्ससह चार स्टाईक्स क्षेपणास्त्रे डागली, पाकिस्तान नौदल ताफ्याचा टँकर डाका बुडवला आणि कराची येथील केमारी ऑइल स्टोरेज सुविधेचे मोठे नुकसान केले. यातही पुन्हा, भारतीय नौदलाचे कोणतेही नुकसान झाले नाही. जहाजे आणि स्क्वाड्रनमधील जवानांच्या या स्पृहणीय कर्तृत्वामुळेच त्यांना ‘किलर’ ही पदवी मिळाली आणि तेव्हापासून भारतीय नौदल ०४ डिसेंबर हा ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करते.

KillerSquadron5UR9H

२०२१ हे वर्ष १९७५ च्या या युद्धातील विजयाचा ५० वा वर्धापन दिन आहे आणि देशभरात स्वर्णिम विजय वर्ष म्हणून साजरा केला जात आहे. गेल्या पाच दशकांमध्ये समुद्रातून विश्वासार्ह कामगिरी बजावण्याची क्षमता असणाऱ्या किलर्सच्या कार्याला यंदा पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय नौदलाच्या स्वार्ड आर्मच्या अग्रभागी असलेली, युद्धासाठी सज्ज अशी ही क्षेपणास्त्र युद्धनौका ऑपरेशन विजय, ऑपरेशन पराक्रम यानंतर अगदी अलीकडे, पुलवामा हल्ल्यानंतर वाढविलेल्या सुरक्षा स्थितीत पाकिस्तानच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर तैनात करण्यात आली होती. एक महावीर चक्र, सात वीर चक्र आणि आठ नौसेना पदके (शौर्य) यासह अनेक प्रतिष्ठित युद्ध सन्मान मिळविल्याचा स्क्वॉड्रनला अभिमान आहे, जो किलर्सच्या शौर्याची साक्ष देतो. २२ व्या क्षेपणास्त्र युद्धनौका स्क्वॉड्रनमधील सर्वात तरुण आणि सर्वात प्रेरित जवानांद्वारे चालवले जाणारे, अत्याधुनिक शस्त्रे आणि सेन्सर्सने सुसज्ज असलेले हे प्राणविघातक जहाज उच्च गतीने आणि गुप्त हल्ले करण्यास सक्षम असून‌ शत्रूंकडून होणाऱ्या कोणत्याही आगळीकीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी नौदलाने राष्ट्राला दिलेले हे अभिवचन आहे. या निर्भय युद्धनौकाच्या परिचालनासाठी प्रेसिडेंट’स स्टॅंडर्ड सन्मान प्रदान करणे, ही त्या वीरांना योग्य आदरांजली आहे ज्यांनी या ‘किलर स्क्वाड्रन’चा एक भाग म्हणून देशाची अमूल्य सेवा केली आहे.


Tags: २२ वी किलर स्क्वॉड्रन्सMissile Vessel SquadronPRESIDENT’S STANDARDramnath kovindभारतीय नौदलमानकमिसाईल व्हेसल स्क्वॉड्रनरामनाथ कोविंद
Previous Post

परमबिरांविरोधात महाराष्ट्र सरकारची कडक भूमिका! ‘जागल्या’ नाहीत, कारवाईनंतर जागले!

Next Post

निवडणूक प्रतिज्ञापत्र खटल्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर आरोप निश्चित

Next Post
devendra fadanvis

निवडणूक प्रतिज्ञापत्र खटल्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर आरोप निश्चित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!