Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुणवंतांना डावललं, बेरोजगारांना लुटलं! सुपेनं गडगंज कमवलं! कोट्यवधीचं घबाड जप्त!!

सायबर पोलिसांकडून अटकसत्र सुरु, वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत धागेदोरे निघण्याची शक्यता

December 21, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
TET exam scam

मुक्तपीठ टीम

पुणे सायबर पोलिसांनी महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकर यांच्यासह आणखी काहींना अटक केली आहे. सुपेंच्या चौकशीनंतर पुणे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ८८ लाख रोख आणि सोनं मिळून ८९ लाखांचा ऐवज जप्त केला होता. मात्र, पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेंची आणखी चौकशी केली असता त्यांना पैसे लपवण्यात त्यांची मुलगी कोमल पाटील आणि जावई नितीन पाटील यांनी मदत केल्याचं समोर आलं. पुणे पोलिसांनी त्या दोघांना चौकशीला बोलावल्यानंतर छापा टाकून १ कोटी ५९ लाखांची रोख रक्कम आणि ७० लाखांचं सोनं जप्त केलं आहे. दरम्यान, परीक्षा आयुक्त सुखदेव डेरे, परीक्षा घेण्याचे कंत्राट मिळालेल्या जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विन कुमार आणि संजय सानपला बीडमधून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची वाढती व्याप्ती आणि आर्थिक व्यवहार पाहता राज्य प्रशासनातील आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत धागेदोरे पोहचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे पोलिसांनी केली कसून चौकशी

तुकाराम सुपेंची मुलगी आणि जावई यांची चौकशी केल्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांच्या आळंदीमधल्या चऱ्होलीमधल्या घरावर छापा टाकला. यामध्ये पोलिसांना ९७ हजार रुपये आढळले. यानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा चौकशी केली. नितीन पाटील यांनी पैशांची बॅग त्याचा मित्र बिपीनच्या फ्लॅटवर ठेवल्याची कबुली दिली. यानंतर पुणे पोलिसांनी १ कोटी ५९ लाखांची रोख रक्कम आणि ७० लाखांचं सोनं जप्त केलं.

 

तुकाराम सुपेवर निलंबनाची कारवाई

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमान्वये अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आलं आहे. त्यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय पुण्यातलं मुख्यालय सोडता येणार नाही, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

दरम्यान, टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी सायबर पोलिसांनी एकाला बीडमधून अटक केली आहे. बीडमधल्या पाटोद्यामध्ये राहणाऱ्या संजय शाहूराव सानप याचा या गुन्हयात सहभाग असल्याचं आढळल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. सायबर पोलिसांचे अटकसत्र सुरुच आहे.

परीक्षा आयुक्त सुखदेव डेरेला अटक

  • टीईटी पेपर फुटी प्रकरणी परीक्षा विभागाचे माजी आयुक्त सुखदेव डेरे याला अटक झाली आहे.
  • सुखदेव डेरे औरंगाबाद विभागीय बोर्डाचा अध्यक्ष होता.
  • यापूर्वी डेरेला निलंबित करण्यात आले होते.

 

बंगळुरुतून परीक्षा कंपनीच्या संचालकाला अटक

  • परीक्षा घेण्याचे कंत्राट मिळालेल्या जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विन कुमार याला बंगळूरमधून अटक करण्यात आली आहे.
  • पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणी थेट राज्याबाहेर कारवाई केली.
  • या प्रकरणाचे धागेदोरे हे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताना दिसत आहेत.
  • आश्विन कुमार हा २०१७मध्ये जी ए टेक्नॉलॉजीचा संचालक होता.
  • प्रीतिश देशमुखचा हा वरिष्ठ होता.

संजय सानपला बीडमधून अटक

  • टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात सायबर पोलिसांनी बीडच्या पाटोद्यामधील वगझरीतून संजय शाहूराव सानप याला अटक करण्यात आली.

Previous Post

पेपर फुटीतून धडा! आता म्हाडाची परीक्षा फेब्रुवारीत ऑनलाईन होणार!

Next Post

चंद्रपूरमधील दारुबंदी उठवण्याला उच्च न्यायालयात आव्हान!

Next Post
Chandrapur liquor ban

चंद्रपूरमधील दारुबंदी उठवण्याला उच्च न्यायालयात आव्हान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!