मुक्तपीठ टीम
बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी भाजापाच्या विरोधातील पक्षाच्या नेत्यांना न्यूज चॅनल्सच्या चर्चेपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. तेजस्वी यांनी काही टीव्ही न्यूज चॅनल्स हे सरळसरळ भाजपाच्या बाजूने असल्याचा आरोप केला आहे. भाजपाविरोधातील पक्षांच्या सर्व नेत्यांना पत्र लिहून त्यांनी न्यूज चॅनल्सच्या चर्चेत सामील न होण्यास सांगितले आहे.
तेजस्वी यादव यांच्या पत्रातील मुद्दे:
न्यूज चॅनल्स चर्चेचा हेतू एका पक्षाच्या फायद्याचा!
- बर्याच न्यूज चॅनल्सवरील संध्याकाळी होणाऱ्या चर्चांसंदर्भात मी हे पत्र आपणा सर्वांना लिहित आहे.
- प्रत्येक दिवशी विशिष्ट उद्देशाने संध्याकाळी विरोधी पक्षांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे.
- आता हेही स्पष्ट दिसतंय की माध्यमांचा एक मोठा वर्ग भाजपाला निवडणुकीत मदत करण्याचे काम करीत आहे.
- कोणत्याही चर्चेत विरोधी पक्षदेखील कोणत्याही विषयावर आपले मत मांडण्यात सक्षम असतात.
- परंतु ज्याप्रकारे चर्चेला पुढे ढकलले जाते, त्यातून स्पष्ट आहे की त्यांचा हेतू फक्त एका पक्षाला फायदा करून देण्याचा आहे.
निष्पक्ष चर्चेची शक्यताच नाही!
- अशा स्थितीत मला नाही वाटत की न्यूज चॅनल्सवर निष्पक्ष चर्चेची शक्यता उरली आहे.
- अशा चर्चांमध्ये विरोधी नेते केवळ यासाठी असतात, ज्यामुळे ते आपल्या खोटेपणावर बनावट विश्वसनीयतेचे आवरण पांघरू शकतील. बर्याच ज्येष्ठ पत्रकारांनी मला असेही सांगितले आहे की अशा न्यूज चॅनल्समध्ये पत्रकारितेच्या नीतीमत्तेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले आहे.