Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

बिग बॉस विजेती तेजस्वी प्रकाश वायंगणकर…इंजिनीअर तरुणीचं ग्लॅमरस यश!

January 31, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
tejaswwi Prakash

रोहिणी ठोंबरे / मुक्तपीठ टीम

तेजस्वी प्रकाश बिग बॉस १५ ची विजेती ठरली आहे. प्रतीक सेहेजपाल दुसऱ्या क्रमांकावर आणि करण कुंद्रा तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत. यासोबतच बिग बॉस १५ चा हा प्रवास संपला आहे. यात अनेक कलाकारांनी भाग घेतला. ग्रँड फिनालेमध्ये सलमान खानने दोन फायनलिस्टचा हात धरला आणि विजेती म्हणून तेजस्वीचं नाव जाहीर केलं. अनेकांना आजही कल्पना नसावी की बिग बॉस विजेती ठरलेली तेजस्वी प्रकाश ही आपली मराठी मुलगी आहे. तिचं पूर्ण नाव ‘तेजस्वी प्रकाश वायंगणकर’ आहे.

 

Bigg Boss season pan pana pan pandrah ki trophy ko mil chuka hai uska asli haqdaar 🤩

Ab intezaar hua khatam and the time has come for @itsmetejasswi to celebrate this magnificent win 🥳@BeingSalmanKhan #BB15 #BiggBoss #BiggBoss15Finale pic.twitter.com/23uwKgzy6b

— ColorsTV (@ColorsTV) January 30, 2022

 

अभिनय करिअरच्या सुरुवातीलाच मोठा वाद!

See the source image

  • बिग बॉस शो विजेती तेजस्वी टीव्ही क्षेत्रातील एक सुंदर अभिनेत्री आहे.
  • २०१७ मध्ये अभिनेत्री तेजस्वी प्रकाशची सीरियल ‘पहरेदार पिया की’ टेलिकास्ट झाली होती.
  • सुरुवातीच्या काळात चाहत्यांना ही मालिका खूप आवडली होती, पण हळूहळू मालिकेच्या कथेमुळे प्रेक्षक खूप नाराज झाले.
  • कारण या मालिकेत तेजस्वीचे लग्न अवघ्या ९ वर्षांच्या मुलाशी होताना दाखवण्यात आले होते.
  • त्यामुळे हा शो मध्येच थांबवावा लागला.

 

तेजस्वी प्रकाशचा इंजिनीअरिंग क्षेत्रातील तेजस्वी प्रवास

See the source image

  • तेजस्वी प्रकाशचा जन्म १० जून १९९२ रोजी सौदी अरेबियातील जेद्दा शहरात झाला.
  • तिचे वडील प्रकाश वायंगणकर आणि भाऊ प्रतिक वायंगणकर हे इंजिनीअर आहेत.
  • त्यामुळे घरून इंजिनीअरिंग शिक्षणाची आवड उपजतच रुजली होती.
  • त्यामुळे शालेय शिक्षण पूर्ण करून तिने इंजिनीअरिंग क्षेत्रात प्रवेश केला.
  • तिचे लहानपणापासूनच इंजिनीअर होण्याचे स्वप्न होते.
  • संपूर्णपणे शिक्षणावर लक्ष दिल्याने तिचे इंजिनीअर बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
  • तेजस्वीने मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली.
  • पण काही काळानंतर तेजस्वीने आपले करिअर क्षेत्र बदलण्याचा निर्णय घेतला.

 

इंजिनीअर तरुणीचं अभिनय क्षेत्रातील ग्लॅमरस यश

See the source image

  • तेजस्वी प्रकाशने इंजिनीअरिंगच्या पदवीसोबतच अभिनय विश्वात प्रदार्पण केले.
  • जेव्हा ती टीव्हीवर दिसली तेव्हा, ती फक्त १८ वर्षांची होती.
  • तेजस्वीची पहिली मालिका ‘२६१२’ आहे, जी २०१२ मध्ये प्रसारित झाली होती.
  • यानंतर ती अनेक मालिकांमध्ये ती झळकली, ज्यात ‘स्वरागिनी-जोडे रिश्ते का सूर’, ‘पेहेदार पिया की’, ‘सिलसिला बदलते रिश्तों का’ सारख्या टीव्ही मालिकांचा समावेश आहे.

 

टीव्ही विश्वातील रिअॅलिटी शोमध्ये तेजस्वीचा सहभाग

See the source image

  • तेजस्वी प्रकाशने टीव्हीसोबतच अनेक रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे.
  • तिची क्यूट स्टाइल प्रत्येक शोमध्ये पाहायला मिळाली, जी चाहत्यांना खूप आवडली आहे.
  • तेजस्वीने ‘फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी’, ‘किचन चॅम्पियन ५’, ‘कॉमेडी नाइट्स लाइव्ह’ असे अनेक रिअॅलिटी शो केले आहेत.
  • आता ती बिग बॉस १५ ची विजेतीही बनली आहे.

Tags: BigBoss 15salman khanTejasswi Prakashइंजिनीअरतेजस्वी प्रकाशबिग बॉस १५मराठी मुलगीसलमान खान
Previous Post

“गांधीजींचे विचार आजही मार्गदर्शक, जगभर प्रेरणा देतात!”

Next Post

आता संजय राऊतांशी मनसेचाही सामना! “राजसाहेबांवर टीका करणाऱ्या ‘संजय’ना आता दिव्यदृष्टी?” – संदीप देशपांडे

Next Post
mns vs sena

आता संजय राऊतांशी मनसेचाही सामना! "राजसाहेबांवर टीका करणाऱ्या 'संजय'ना आता दिव्यदृष्टी?" - संदीप देशपांडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!