Thursday, March 12, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिवसेनेत आदित्य ठाकरेंच्या संयमी शैलीला तेजस ठाकरेंच्या आक्रमकतेची जोड मिळणार?

वाढदिवसाला सामनातील शुभेच्छा जाहिरात चर्चेचा विषय!

August 7, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
thackeray

मुक्तपीठ टीम

शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. स्वाभाविकच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. शुभेच्छांच्या या वर्षावात शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनातील पहिल्या पानावरील जाहिरात चर्चेचा विषय ठरली आहे.

 

निवडणुकीच्यावेळी तेजस ठाकरे नगरमध्ये मंचावर दिसल्यानंतर उद्धव ठाकरेंनी तो जंगलात रमणारा असून फक्त सभा पाहायला आल्याचे सांगत राजकारण प्रवेशाचा इंकार केला होता. मात्र, तरीही जाहिरातीमुळे पुन्हा एकदा नव्या ठाकरेंच्या राजकारण प्रवेशाची चर्चाही सुरु झाली आहे. तेजस ठाकरेंचं कौतुक करताना शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंनी ‘तोडफोड सेना’ उल्लेख केला होता. त्याची आठवण देत, त्यामुळे तेजस ठाकरेंचे पॉलिटिकल लाँचिंग झाले तर शिवसेनेत आदित्य ठाकरेंची संयमी शैली आणि तेजस ठाकरेंची आक्रमकता असा अनोखा संगम पाहण्यास मिळेल, असं म्हटलं जात आहे.

 

Tejas Thackeray
दैनिक सामनात ही जाहिरात शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दिली आहे. त्या जाहिरातीत त्यांनी “ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस् तेजस उद्धव ठाकरे यांना जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा” असं म्हटलं आहे. तेजस ठाकरे हे वन्यजीवप्रेमी संशोधक आहेत. त्यांनी आजवर अनेक नव्या दुर्मिळ वन्यजीवांचा शोध लावला. त्यामुळे क्रिकेटशी थेट संबंध नसतानाही त्यांची व्हिव्हियन रिचर्डस यांच्याशी तुलना केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

 

आदित्य ठाकरेंच्या संयमी शैलीला तेजस ठाकरेंच्या आक्रमकतेची जोड मिळणार?

  • युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या लाँचिगदरम्यान बाळासाहेब ठाकरे यांनी तेजसचे कौतुक केलं होतं.
  • “तेजसची तोडफोड सेना आहे. त्याची स्टाईल माझ्यासारखी, छंद माझ्याशी जुळणारे, वन्यजीवन त्याला खूप आवडते,”
  • या शब्दांमध्ये शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी कौतुक केले होते.
  • तेजस ठाकरे हे घरात आक्रमक असल्याने त्यांचं कौतुक करताना बाळासाहेब ठाकरे ‘तोडफोड सेना’ म्हणाले होते.
  • त्यामुळे तेजस ठाकरेंचे पॉलिटिकल लाँचिंग झाले तर शिवसेनेत आदित्य ठाकरेंची संयमी शैली आणि तेजस ठाकरेंची आक्रमकता असा अनोखा संगम पाहण्यास मिळेल.

वडिलांसारखाच जंगलात रमणारा पण संशोधक वृत्तीचा तरुण!

  • त्यांचा मोठा भाऊ आदित्य ठाकरे यांच्या निवडणुकीच्यावेळी ते तेथे दिसले होते, मात्र, तेजस ठाकरे अद्याप सक्रीय राजकारणात उतरलेले नाहीत.
  • उद्धव ठाकरेंप्रमाणेच तेजस ठाकरेही जंगलात रमतात.
  • वडिलांना वन्यजीवांचे छायाचित्रण कमालीचे आवडते.
  • ते खूप चांगले वन्यजीव छायाचित्रकार म्हणूनही नावाजले जातात.
  • तेजसची आवड मात्र वन्यजीव संशोधनाची आहे.
  • तेजस ठाकरे यांनी खेकड्यांच्या नव्या प्रजाती शोधून काढल्या आहेत.
  • यातील एका प्रजातीला त्यांनी ठाकरे नाव दिलं आहे.
  • त्यांनी गेल्यावर्षी पालीच्या दुर्मिळ प्रजातीचा शोध लावला होता.

पश्चिम घाटातील जैवविविधतेतेच्या माहितीत त्यांच्या संशोधनामुळे मोलाची भर

  • तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर, इशान अग्रवाल आणि सौनक पाल या चार संशोधकांनी २०१४ मध्ये या पालींच्या प्रजातीचा शोध लावला होता.
  • पाच वर्षांच्या सखोल संशोधनानंतर त्या दुर्मिळ प्रजातींच्या पालींचे जनुकीय वेगळेपण ठरवण्यात आलं. या नव्याने शोधण्यात आलेल्या दुर्मिळ पालीचं नाव ‘मँग्निफिसंट डवार्फ गेको’ असं ठेवण्यात आलं आहे.
  • सप्टेंबर २०२० मध्ये तेजस यांनी सापाच्या नव्या प्रजातीचा शोध लावला होता. महाराष्ट्राच्या पश्चिम सह्याद्री घाटातून ‘कॅट स्नेक’ सापाच्या एका नव्या प्रजातीचा शोध लागला होता. या सापाच्या नव्या प्रजातीचं नाव ‘बोईगा ठाकरे’ असं ठेवण्यात आलं.
  • पश्चिम घाटातील जैवविविधतेतेच्या माहितीत त्यांच्या संशोधनामुळे मोलाची भर पडत असते.

Tags: Aaditya ThackerayShivsenaतेजस ठाकरेतोडफोड सेनामिलिंद नार्वेकरमुख्यमंत्री उद्धव ठाकरेव्हिव्हियन रिचर्डस्शिवसेना
Previous Post

सीमाभागातील मराठी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी क्रांती दिनी पंतप्रधानांना बेळगाव सीमाभागातून हजारो निवेदने

Next Post

शिवाजी पार्कवर सोनिया गांधी व राहुल गांधींच्या उपस्थितीत मेळावा!

Next Post
congress

शिवाजी पार्कवर सोनिया गांधी व राहुल गांधींच्या उपस्थितीत मेळावा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!