मुक्तपीठ टीम
“शिक्षक हा ही एक विद्यार्थीच असतो. वर्गांत शिकवण्यासाठी त्यालाही अभ्यास करावाच लागतो त्यामुळेच शिक्षक कधीही निवृत्त होत नसतो तर तो केवळ आपल्या नोकरीतून मुक्त होत असतो” असे प्रतिपादन हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी येथील शिक्षिका रेणुका शेट्टी यांनी केले.
हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल या निवासी शाळेत गेली तीस वर्षे रेणुका शेट्टी मँडम यांनी अध्ययन अध्यापनाचे कार्य केले याच बरोबर टँगोर हाऊसच्या २८ वर्षे गृहपाल म्हणून काम केले. इयत्ता पाचवी ते आठवीचे विद्यार्थी या टँगोर हाऊसमध्ये राहत असत. या निवासी शाळेत पहिली ते बारावीचे विद्यार्थी राहतात. निवासी शाळा म्हणजे केवळ शालेय शिक्षण नव्हे तर वसतीगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांचे संगोपन करणे, व्यक्तीमत्वाचा विकास घडवून व्यवहार ज्ञान देण्याची जबाबदारीही हाँस्टेलमधील गृहपालांना करावी लागते व ती जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पुर्ण केली. यामुळेच विद्यार्थी प्रिय असलेल्या रेणुका मँडमना मात्र कोरोनाच्या संकटामुळे एक वर्षात प्रत्यक्ष संवाद साधता आला नाही याची खंत निवृत्तीच्या वेळी होती. गेली अनेक वर्षे दहावी वर्गाच्या वर्ग शिक्षिका म्हणून त्या काम पाहत होत्या. विद्यार्थ्यांबरोबरच पालक व इतर सहकारी वर्गाशी सुसंवाद होता.
शाळेत विज्ञान प्रमुख म्हणून कार्य करीत असताना अनेक राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार शाळेला प्राप्त करून देणाऱ्या विज्ञान प्रिय शिक्षिका कोरोनाच्या काळातही वेग वेगळे प्रयोग केले व शिक्षण प्रक्रिया चालू ठेवली. आपला विद्यार्थी व शाळा कशी प्रगती करेल हा एकच विचार मनात असलेल्या शिक्षिका सेवेतून निवृत्त झाल्या तरी शिक्षिका म्हणून जीवनातून निवृत्त होत नसतात.