मुक्तपीठ टीम
दिवाळीचा सण जवळ आला आहे. दिवाळीला अनेक भेटवस्तू मिळत असतात. कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देतात. हा बोनसचा पैसा दिवाळीला खूप उपयोगी पडतो. मात्र, या दिवळीत तुम्हालाही अशा भेटवस्तू मिळणार असतील तर, तुम्हाला आयकर नियमांनुसार कर भरणे आवश्यक आहे.
आयकर कायदा काय सांगतो?
- आयकर कायदा १९६१ च्या कलम ५६(२) अंतर्गत ‘इतर स्त्रोतांकडून मिळकत’ म्हणून गणले जाते.
- त्यामुळे जर, तुम्हाला एका आर्थिक वर्षात ५० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या भेटवस्तू मिळाल्या असतील, तर या स्लॅबनुसार करदेखील भरणे आवश्यक आहे.
- आयकर कायद्यानुसार, एखाद्या कंपनीकडून गिफ्ट व्हाउचर किंवा ५ हजार रुपयांपेक्षा कमी गिफ्ट मिळाल्यास कर आकारला जात नाही.
- परंतु, जर ही रक्कम आर्थिक वर्षात ५ हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर, ती पगाराचा भाग मानली जाते.
- यावर कर्मचाऱ्याला कर भरावा लागतो.
मित्रांकडून मिळालेल्या भेटवस्तूवर देखील कर भरावा लागणार!!
- दिवाळीत मित्रांकडून मिळालेल्या भेटवस्तूंनादेखील इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न मानले जाते.
- यासाठी एका आर्थिक वर्षात ५० हजार रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
- एका आर्थिक वर्षात ५० हजारांपेक्षा जास्त किमतीच्या भेटवस्तू मित्रांकडून मिळाल्यास त्यासाठीदेखील तुम्हाला कर भरावा लागतो.
ही भेट करपात्र मानली जाणार…
- तुम्हाला मिळालेली भेट मालमत्ता जंगम किंवा स्थावर असल्यास त्याचे मूल्य आणि मुद्रांक शुल्काच्या मूल्यातील फरक करपात्र मानला जातो.
- समजा, जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला त्याची मालमत्ता हस्तांतरित केली आणि तिचे मूळ मूल्य आणि मुद्रांक शुल्क मूल्य यांच्यातील फरक ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर, ही भेट करपात्र मानली जाते.
यावर नाही द्यावा लागणार कर-
- पती, पत्नी, भाऊ, बहीण, पालक यांच्याकडून मिळालेल्या भेटवस्तूंवर कोणताही कर भरावा लागत नाही.
- यामध्ये वारसा किंवा मृत्युपत्राद्वारे मिळालेली भेट किंवा मालमत्ता कराच्या अखतारित येत नाही.
- याशिवाय हिंदू अविभक्त कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडून मिळालेली भेटदेखील करप्राप्त नाही.
- आयकर कायद्याच्या कलम १०(२३क) अंतर्गत कोणत्याही फंड/फाऊंडेशन किंवा इतर शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल किंवा इतर वैद्यकीय संस्था, ट्रस्टकडून मिळालेली भेटदेखील करात येत नाही.
- याशिवाय कलम १२ अ किंवा १२ आ अंतर्गत नोंदणीकृत कोणत्याही धर्मादाय किंवा धार्मिक ट्रस्टकडून मिळालेली भेटदेखील करामध्ये गणली जात नाही.
या भेटवस्तू स्वीकारू नका-
- जर, तुम्हाला दोन लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम रोख स्वरूपात भेट म्हणून मिळाल्यास त्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.
- त्यामुळे अशा प्रकारचा दंड टाळण्यासाठी २ लाख किंवा त्याहून अधिक रक्कम स्वीकारणे शक्यतो टाळा.
- जर ही रक्कम तुम्ही स्वीकारणारच असाल तर ती चेक किंवा बँक ड्राफ्ट किंवा इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्सच्या माध्यमातूनच स्वीकारावी.