Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

टाटांची सर्वात स्वस्त, सुरक्षित ई-कार! जबरदस्त फिचर्स, ३०० किमीची रेंज!!

September 29, 2022
in featured, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Tata Tiago EV Car

मुक्तपीठ टीम

गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेली टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार अखेर लाँच झाली आहे. टाटाने भारतात आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार टिआगो ईव्ही लॉंच केली आहे. ही कार अनेक नवीन फिचर्ससह ऑफर केली जाईल. टाटा टिआगो आगामी कार २६ किलो वॅट बॅटरी आणि एका चार्जवर ३०० किमी पर्यंतची रेंज देखील देऊ शकते. सुरक्षिततेच्या दृष्टीने ही एक पॉवरफुल कार असेल आणि ही कार देखील ग्लोबल एनसीएपी टेस्टिंगमध्ये ४ किंवा ५ स्टार मिळवेल अशी अपेक्षा आहे.

Tata Tiago EV Car

टाटा टिआगो ईव्ही कार फिचर्स

  • ही कार तिच्या पेट्रोल व्हर्जनसारखीच दिसेल.
  • पण, आता कंपनीने या कारमध्ये नवा निळा रंग आणला आहे. टाटा टिगोर आणि टाटा नेक्सॉनच्या ईव्ही मॉडेल्सवर हा रंग आधीच देण्यात आला आहे.
  • कंपनीने कारच्या फ्रंट ग्रिल आणि इंटीरियरवर हा निळा रंग वापरला आहे.
  • उर्वरित कारमध्ये कोणतेही बदल केले गेले नाहीत आणि त्याची रचना पूर्वीसारखीच आहे.
  • टाटा टिआगोमध्ये २६ किलोवॅट बॅटरी वापरली आहे. या बॅटरीमध्ये एका चार्जमध्ये ३०० किमीची रेंज देण्याची क्षमता आहे.
  • या कारची बॅटरी एका इंजिनसह जोडलेली आहे जी ७४.७ पीएस पॉवर आणि १७०एनएम पीक टॉर्क जनरेट करते.
  • ही ड्रॉन्ट व्हील ड्राइव्ह कार असेल. या इलेक्ट्रिक कारची बॅटरी अवघ्या ६५ मिनिटांत ८० टक्के चार्ज होऊ शकते.
  • कंपनी XPres-T व्हेरिएंटमध्ये ही कार लॉंच करेल अशी अपेक्षा आहे. XPres-T व्हेरिएंट कमी शक्तिशाली इंजिनसह येईल आणि एका चार्जवर २०० किमीची रेंज देईल.

 Tata Tiago EV Car

टाटा टिआगो ईव्हीची किंमत किती असणार?

  • ही कार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असेल. कंपनीने या कारची किंमत १० लाख रुपयांपेक्षा कमी ठेवावी अशी अपेक्षा आहे.
  • जर या इलेक्ट्रिक कारची किंमत १० लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर ही कार भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार होईल.

 Tata Tiago EV Car

टाटा टियागो या कारमध्ये पेट्रोल वेरिएंटपेक्षा काही अधिक फीचर्स मिळू शकतात. या नवीन कारमध्ये क्रूझ कंट्रोल आणि मल्टिपल री-जेन मोड दिले जातील. या इलेक्ट्रिक कारमध्ये राइडिंग मोड देखील दिले जाऊ शकतात. या रायडिंग मोड्सच्या मदतीने चांगली रेंज मिळेल.

पाहा व्हिडीओ:


Tags: Cheap Electric Carsgood newsLatest TechmuktpeethTata MotorsTata Tiago EV Carचांगली बातमीटाटा टिआगो ईव्ही कारटाटा मोटर्समुक्तपीठलेटेस्ट टेकस्वस्त इलेक्ट्रिक कार
Previous Post

मराठा आंदोलकांची उद्धव ठाकरेंशी चर्चा, वाचा त्यांना दिलेलं पत्र…

Next Post

नवरात्रोत्सव: कोल्हापुरात महिला पर्यटकांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने भेटवस्तूंचे वाटप

Next Post
Kolhapur Sri Ambabai Devi

नवरात्रोत्सव: कोल्हापुरात महिला पर्यटकांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने भेटवस्तूंचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!