महाराष्ट्रातील कर्जत लोणावळा खंडाळा परिसरातील भिवपुरी इथं टाटांचा जलविद्युत प्रकल्प आहे. १९२२ मध्ये वीज निर्मिती सुरु करण्यात आलेल्या या प्रकल्पात सध्या एका वर्षभरात जवळपास ३०० मेगायुनिट्स वीज निर्मिती केली जाते. जी महाराष्ट्राची मोठी गरज भागवते. हा जलविद्युत प्रकल्प मुंबईच्या आयलॅंडिंग सिस्टिमला साहाय्य देतो. या प्रकल्पात ब्लॅक स्टार्ट क्षमता असल्याने कोणतीही आणीबाणी उद्भवल्यास बॅकअप ऊर्जा स्रोत म्हणून काम करतो.