मुक्तपीठ टीम
कोणत्याही मोठ्या पोलाद प्रकल्पात ब्लास्ट फर्नेस (बीएफ) गॅसमधून उत्सर्जित कार्बन डायऑक्साइड (सीओ -2) ही मोठी प्रदूषणकारी समस्या मानली जाते. पण सामाजिक दायित्व निभावण्यात सतत अग्रेसर असणाऱ्या टाटा समुहाने याही बाबतीत पुढचे पाऊल उचलले आहे. ब्लास्ट फर्नेस (बीएफ) गॅसमधून उत्सर्जित कार्बन डायऑक्साइड (सीओ -2) शोषण्यासाठी प्रकल्प विकसित करणारी टाटा स्टील ही देशातील पहिली कंपनी आहे.
कंपनीचे सीईओ तसेच एमडी असणारे टी.व्ही नरेंद्रन यांच्या हस्ते या प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.
सीओ -2 प्रदूषण रोखणारी यंत्रणा आहे तरी कशी?
- कार्बन कॅप्चर अँड युटिलायझेशन (सीसीयू) सुविधा, अमाईन आधारित तंत्रज्ञानाचा उपयोग करते.
- कॅलरीफिक मूल्यासह कॅप्चर केलेला कार्बन डाय ऑक्साईड पुन्हा प्रकल्पाच्या गॅस नेटवर्कमध्ये पाठवला जातो.
- या प्रकल्पाची क्षमता दररोज पाच टन आहे.
- सर्क्युलर कार्बन अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी टाटा स्टील आपल्या प्रकल्पामधून येणाऱ्या कार्बन डाय ऑक्साईडचा पुन्हा वापर करेल.
- सध्या दररोज पाच टन कार्बन डाय ऑक्साईड घेतला जात आहे.
- प्रात्यक्षिक यशस्वी झाल्यास कार्बन कॅप्चर प्रकल्पांची संख्या वेगाने वाढवण्याची योजना आहे.
- ब्लास्ट फर्नेसमधून कार्बन डाय ऑक्साईड कॅप्चर केल्याने स्टील प्लांट कार्बनमुक्त तर बनतीलच पण, हायड्रोजन अर्थव्यवस्थेचा मार्गही खुला होईल.
कार्बन क्लीन नावाच्या संस्थेच्या तांत्रिक सहाय्याने हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. यासाठी, कंपनीने सप्टेंबर २०२० मध्येच कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन अँड स्टोरेजसोबत जोडून देशातील पॅरिस कराराअंतर्गत डी-कार्बनायझेशनच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी एक मजबूत इकोसिस्टम तयार केली आहे.
डी-कार्बनायझेशनच्या दिशेने उचलली पावले
- उद्घाटन प्रसंगी बोलताना, एमडी टीव्ही नरेंद्रन म्हणाले की, आम्ही रणनीतिकदृष्ट्या डी-कार्बनायझेशनच्या दिशेने वाटचाल केली आहे.
- भविष्यासाठी नवीन मानके ठरवण्यात येत आहेत.
- विकसनशील देशांमध्ये, विशेषत: भारतासारख्या देशात पोलाद उद्योगाच्या शाश्वततेसाठी, मोठ्या प्रमाणावर कार्बन डाय ऑक्साईड कॅप्चर करून आणि पुन्हा वापरून किफायतशीर उपाय शोधणे अत्यावश्यक आहे.
- यामुळे कार्बन डाय ऑक्साईड गॅस उत्सर्जन कमी होईल, खर्च कमी होईल आणि प्रकल्पाला 0ऊर्जा मिळेल.
- अशा प्रकल्पांमधून मिळालेला अनुभव भविष्यातील मोठे कार्बन प्लांट्स उभारण्यासाठी आवश्यक डेटासह मदत करेल.
- कार्बन कॅप्चर प्लांटची संख्या वाढवली जाईल.