Saturday, May 17, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

टाटा पॉवरचं ‘ट्री मित्र’ अॅप, प्रत्येक डाऊनलोडसाठी एक रोपटे लावण्याची प्रतिज्ञा!

January 26, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Tree mittra App

मुक्तपीठ टीम

टाटा पृथ्वीच्या कल्याणासाठी केल्या जात असलेल्या सामूहिक प्रयत्नांमध्ये आपले योगदान म्हणून आंतरराष्ट्रीय शिक्षण दिनी ट्री मित्र अॅप सुरु केले आहे. या अनोख्या उपक्रमाचा उद्देश पर्यावरणस्नेही कामे करून पृथ्वीचे रक्षण करण्याच्या व्यक्तिगत क्षमतेला उपयोगात आणण्याचा आहे. तसेच हरित भविष्य निर्मितीसाठी जैवविविधतेच्या समर्थकांना प्रोत्साहन देणे हा आहे.

 

हे अॅप विना-नफा तत्त्वावर चालवले जाणार असून, ते निःशुल्क आहे. भारतातील जैवविविधतेचे महत्त्व जास्तीत जास्त लोकांना समजावे हा या अॅपचा उद्देश आहे. यामध्ये एक ५२ चित्रे असलेले वॉलपेपर कॅलेंडर आहे, प्रत्येक चित्र एका अनोख्या भारतीय झाडाची माहिती देते. अॅपच्या प्रत्येक डाउनलोडसोबत भारतातील आपल्या कार्यस्थळांच्या आसपास एक रोपटे लावण्याची प्रतिज्ञा कंपनीने केली आहे. अशा प्रकारे आपल्या स्मार्टफोन्सवर फक्त काही क्लिक्स करून खरे ट्री मित्र बनण्याची शक्ती हे अॅप आपल्या युजर्सना प्रदान करणार आहे.

 

भारतातील सर्वात मोठी एकात्मिक वीज कंपनी म्हणून, एक हरित आणि शुद्ध ऊर्जा ब्रँड बनण्याच्या दिशेने कार्य नेतृत्वावर लक्ष केंद्रित करत, टाटा पॉवर आपले कर्मचारी, ग्राहक आणि हितधारक यांना प्रेरित करण्यासाठी आणि त्यांना सहभागी करवून घेण्यासाठी अनेक उपक्रमांचे आणि पर्यावरणानुकूल प्रथांचे समर्थन करते.

 

वनीकरण अभियानामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देण्याबरोबरीनेच हे अॅप झाडांबद्दल अनोखी माहिती उपलब्ध करवून देते आणि पर्यावरणानुकूल प्रथांचे पालन करण्याचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचवते. या अॅपमधील आकर्षक वॉलपेपर अतिशय प्रभावी पद्धतीने पर्यावरण सुरक्षेचा संदेश देतात. मोबाईल स्क्रीन्सच्या बॅकग्राउंडवर हे वॉलपेपर्स दर आठवड्याला अपडेट केले जातील.

 

जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी टाटा पॉवरमार्फत केल्या जात असलेल्या प्रयत्नांमध्ये ट्री मित्र अॅप हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. ट्री मित्र उपक्रमांतर्गत टाटा पॉवर गेल्या ४० वर्षांपासून एक अनोखे वृक्षारोपण अभियान चालवत आहे, ज्यामध्ये कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना एक झाड लावून, ते दत्तक घेण्यासाठी आणि त्याची संपूर्ण देखभाल करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. या कालावधीत महाराष्ट्र, झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा, गुजरात आणि कर्नाटकामध्ये समूहाच्या अनेक कार्यस्थळांच्या आसपास १०० लाखांहून जास्त झाडे लावली गेली आहेत.

 

पश्चिम घाट आणि भारतातील इतर अनेक ठिकाणी आपल्या ऑपरेटिंग साईट्सच्या जवळपासच्या भागातील वनस्पती व जीवांच्या व्यापक विविधतेच्या संरक्षणासाठी कंपनीने गेल्या अनेक वर्षात अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. कंपनीची अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेली वाल्व्हन गार्डन्स आणि महाराष्ट्रातील लोणावळा येथील ५० वर्षांपासून चालवला जात असलेला ‘ऍक्ट फॉर माहसीर’ कार्यक्रम ही कंपनीच्या पर्यावरण सुरक्षेप्रती निष्ठेची द्योतके आहेत.

 

पर्यावरणस्नेही आणि जबाबदारीचे पूर्ण पालन करणारी धोरणे स्वीकारून पर्यावरण संरक्षण अजेंड्यामध्ये योगदान देण्यासाठी टाटा पॉवर वचनबद्ध आहे. २०४५ च्या आधी कार्बन तटस्थता साध्य करण्यासाठी वचनबद्धता स्वीकारणारी ही देशातील पहिली वीज कंपनी आहे आणि डब्ल्यूबीसीएसडी व जगातील इतर १० कंपन्यांच्या सहयोगाने वीज कंपन्यांसाठी पहिला एसडीजी रोडमॅप बनवणारी ही एकमेव भारतीय कंपनी आहे. २०३० पर्यंत वॉटर न्यूट्रॅलिटी आणि झीरो वेस्ट टू लँडफिल साध्य करण्यासाठी एक सुस्पष्ट रोडमॅप देखील टाटा पॉवरने विकसित केला आहे.

 

ट्री मित्र अॅप निःशुल्क डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करवून देऊन हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हा टाटा पॉवर कंपनीचा उद्देश आहे. आपला व्यापक उद्देश पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी क्लायमेट ऍक्शन चॅम्पियन्स बनावे यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे हा देखील या उपक्रमाचा उद्देश आहे.

गूगल प्लेस्टोर लिंक: https://play.google.com/store/apps/details?id=com.treemitra.app

 

About Tata Power:

Tata Power (NSE: TATAPOWER; BSE:500400) is one of India’s largest integrated power companies and together with its subsidiaries and jointly controlled entities, has an installed/managed capacity of 13,171 MW. The Company has a presence across the entire power value chain – generation of renewable as well as conventional power including hydro and thermal energy, transmission & distribution, coal & freight, logistics, and trading.
The Company had developed the country’s first Ultra Mega Power Project at Mundra (Gujarat) based on super-critical technology. With 4.3 GW of clean energy generation from solar, wind, hydro, and waste heat recovery accounting for 33% of the overall portfolio, the company is a leader in clean energy generation.
It has successful public-private partnerships in generation, transmission & distribution in India viz: Powerlinks Transmission Ltd. with Power Grid Corporation of India Ltd. for evacuation of Power from Tala hydro plant in Bhutan to Delhi, Maithon Power Ltd. with Damodar Valley Corporation for a 1,050 MW Mega Power Project at Jharkhand.

Tata Power is currently serving more than 12 million consumers via its Discoms, under public-private partnership model viz Tata Power Delhi Distribution Ltd. with Government of Delhi in North Delhi, TP Northern Odisha Distribution Limited, TP Central Odisha Distribution Limited, TP Western Odisha Distribution Limited, and TP Southern Odisha Distribution Limited with Government of Odisha.
With a focus on sustainable and clean energy development, Tata Power is steering the transformation an integrated solutions providers by looking at new business growth in distributed generation through rooftop solar and microgrids, storage solutions, EV charging infrastructure, ESCO, home automation & smart meters et al.
With its 107 years track record of technology advancements, project execution excellence, world-class safety processes, customer care,and green initiatives, Tata Power is well poised for multi-fold growth and is committed to lighting up lives for generations to come. For more information visit us at: www.tatapower.com

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: Discomsforestation campaigngood newsIndiamuktpeethTata PowerTata Power Delhi Distribution LtdTree mittra Appचांगल्या बातम्याटाटा पॉवरट्री मित्र अॅपभारतमुक्तपीठरोपटे लावण्याची प्रतिज्ञावनीकरण अभियान
Previous Post

रायगडात वृक्षवल्लींसाठी अध्यात्मिक गुरुकुल, सामाजिक बांधिलकी जपत वेगळं कार्य

Next Post

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या वारली कलेचा वेगळाच दिमाख

Next Post
kala kumbh

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या वारली कलेचा वेगळाच दिमाख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!