मुक्तपीठ टीम
टाटा पॉवर आणि आयआयटी दिल्ली यांनी स्मार्ट ग्रिड तंत्रज्ञान व शुद्ध ऊर्जा सुविधा या क्षेत्रांमध्ये एकमेकांच्या सहयोगाने काम करण्याच्या एका समझोत्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
आयआयटी दिल्ली आणि टाटा पॉवरमध्ये विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या तज्ज्ञांची मोठी संख्या आहे. शिक्षण क्षेत्र, संशोधन आणि व्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञांमध्ये सहयोग वाढवत चांगले संशोधन आणि जीवनावर चांगले प्रभाव पाडणारे बदल घडवून आणणे शक्य आहे. ईलेक्ट्रिक गाड्यांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, हायड्रोजन तंत्रज्ञान, बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टिम, निगराणी व संवेदना सुविधा, मायक्रोग्रिड यासारख्या क्षेत्रांमध्ये पुढे जाण्यावर दोन्ही संस्थांनी सहमती दर्शवली आहे.
आयआयटी दिल्लीचे संचालक प्रोफेसर व्ही रामगोपाल राव यांनी सांगितले, “देशातील प्रमुख संशोधन संस्था आयआयटी दिल्लीला टाटा पॉवरसोबत सहयोग करताना आनंद होत आहे. मला वाटते की, या भागीदारीमुळे ऊर्जा क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानांचा विकास होईल, जो वीज उत्पादन व वितरण क्षेत्रासाठी उपयुक्त ठरेल.”
टाटा पॉवरचे सीईओ आणि एमडी डॉ प्रवीर सिन्हा म्हणाले, “टाटा पॉवरमध्ये आम्ही नेहमीच ऊर्जा क्षेत्रात नवीन आणि शाश्वत तंत्रज्ञान आणण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. देशातील एक प्रतिष्ठित संस्था आयआयटी दिल्लीसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्हाला विश्वास वाटतो की, ही भागीदारी ऊर्जा क्षेत्रात लागू करण्यायोग्य आधुनिक तंत्रज्ञानांसाठी एक टेस्ट बेड तयार करेल ज्यामुळे देशात शुद्ध ऊर्जा इकोसिस्टिम अधिक जास्त मजबूत होईल.”
गेल्या काही वर्षात टाटा पॉवरने अद्वितीय ऊर्जा उत्पादने, सेवा आणि सुविधा डिझाईन, विकसित व वितरित करण्यासाठी संघटनेअंतर्गत आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये नावीन्यपूर्णता, सर्जनशीलता व उद्योजकतेच्या संस्कृतीच्या विकासाला प्रोत्साहन दिले आहे.
टाटा पॉवर व्हर्च्युअल सेंटर ऑफ एक्सेलन्स विकसित करण्याच्या शक्यता शोधून काढण्यासाठी देखील टाटा पॉवर आणि आयआयटी दिल्लीने सहयोग करण्यावर सहमती व्यक्त केली आहे, या शक्यता दोन्ही संस्थांमध्ये पहिल्यापासून असलेल्या विविध तंत्रज्ञान, प्रयोगशाळा आणि पायाभूत संरचना यांना पूरक असतील. या करारानुसार, दोन्ही संस्था क्लीन एनर्जी इंटरनॅशनल इन्क्युबेशन सेंटर (सीईआयआयसी) आणि स्टार्टअप्सच्या इन्क्युबेशन व विकासासाठी आयआयटी दिल्लीच्या स्टार्टअप इन्फ्रास्ट्रक्चरसोबत सहयोगाच्या माध्यमातून ताळमेळाच्या संधी देखील शोधतील. सीईआयआयसीला सोशल अल्फा, टाटा ट्रस्ट्स आणि बायोटेक्नॉलॉजी विभागामार्फत भारत सरकार, बीआयआरएसी, टाटा पॉवर व टाटा पॉवर – दिल्ली डिस्ट्रिब्युशन लिमिटेड यांचे साहाय्य मिळते.
आजवर टाटा पॉवरने आपल्या सहयोग, नावीन्य आणि आर अँड डी विभागामार्फत शुद्ध ऊर्जा क्षेत्रात कमी खर्चाच्या, पुढे वाढवल्या जाण्यायोग्य सुविधा विकसित करण्यासाठी १०० पेक्षा जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान व संस्थांसोबत भागीदारी केली आहे.