मुक्तपीठ टीम
आता मुंबईमध्ये रिअल-टाइम इलेक्ट्रिसिटी ऑपरेशन्सचे एआय ऑटोमेशन करण्यात येणार आहे. वीज क्षेत्रात एआय तंत्रज्ञान वापरासाठी टाटा पॉवर आणि ब्ल्यूवेव-एआय आले एकत्र आले आहेत. भारतातील सर्वात मोठी एकात्मिक वीज कंपनी टाटा पॉवरने जगातील पहिली शुद्ध ऊर्जा एआय कंपनी ब्ल्यूवेव-एआयसोबत तीन वर्षांसाठी व्यापारी करार केला आहे. एक चाचणी प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर हा करार करण्यात आला आहे. या चाचणी प्रकल्पामध्ये टाटा पॉवरने आपल्या पॉवर शेड्यूलिंग कामांमध्ये उपयोगात आणण्यासाठी इंट्रा-डे आणि डे-फॉरवर्ड डिस्पॅच करण्यासाठी ब्ल्यूवेव-एआयच्या क्लाऊड प्लॅटफॉर्मच्या कामगिरीचे परीक्षण केले होते.
भारतात नुकतेच अचूक ऊर्जा निर्धारण अनिवार्य करणारे उपाय लागू करण्यात आले आहेत आणि राष्ट्रीय ग्रिडमध्ये शुद्ध ऊर्जेच्या ऑनबोर्डिंगमध्ये सुधारणेसाठी रिअल-टाइम मार्केटची सुरुवात केली गेली आहे. यामुळे आता ऊर्जा वितरण कंपन्यांना नियोजित ऊर्जा उपयोगापासून विचलित झाल्यास दंड द्यावा लागतो, ऊर्जा निर्धारणात चूक झाल्यास हा दंड वाढतो. आपल्या उद्योगक्षेत्रातील नवप्रवर्तक म्हणून टाटा पॉवरने पॉवर शेड्यूलिंगला अनुकूलित करण्यासाठी आणि अशा प्रकारच्या नव्या नियामक बदलांसोबत पुढे जाण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) ची क्षमता सक्रिय करण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनीने काही एआय सुविधा तैनात केल्या आहेत ज्यामध्ये तोट्याचे आकलन, पूर्वानुमान आणि अलर्ट / सूचनेच्या आधारे मशीन लर्निंगचा उपयोग करणाऱ्या द सेंट्रल कंट्रोल रूम फॉर रिन्यूएबल असेट्स (सीसीआरए) चा समावेश आहे. कोळसा पुरवठा आणि ऑर्डर इन्व्हेंटरी व्यवस्थापन अनुकूलित करण्यासाठी टाटा पॉवरच्या कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेड (सीजीपीएल) आणि मैथन पॉवर प्लांट (एमपीएल) युनिट्समध्ये देखील पिट टू प्लांट कोळसा पुरवठा व्यवस्थापन आणि व्यवस्थापन धोरणात्मक अवलोकन सुविधांचा उपयोग केला जातो. याशिवाय कंपनीच्या मुंबई वितरण टीमने ईमेल वर्गीकरण व रुटिंगसाठी एक सेंटीमेंट अनालिसिस टूल लागू केले आहे जे ग्राहकांच्या गरजांचे सक्रिय मूल्यांकन करण्यात मदत करेल.
ब्ल्यूवेवमार्फत प्रदान करण्यात आलेल्या पूर्वानुमानाशिवाय पीएससीसी टीमने लोड प्रेडिक्शन आणि आरटीएम ऑप्टिमायजेशनवर परिवर्तन विकसित आणि कार्यान्वित केले आहे ज्यामध्ये अनुक्रमे न्यूट्रल नेटवर्क आणि लिनियर प्रोग्रामिंगचा उपयोग केला जातो, अशा प्रकारे अनुकूलित वीज खरेदी सुनिश्चित केली जाते आणि वीज खरेदीचा खर्च इष्टतम पातळीवर ठेवला जातो. टाटा पॉवर आणि ब्ल्यूवेव-एआयच्या नेतृत्व कामगिरीला युटिलिटी डिस्ट्रिब्युशन श्रेणीमध्ये इंडिया स्मार्ट ग्रिड फोरम (आयएसजीएफ) च्या उच्च स्तरीय ‘डायमंड ट्रॉफी’ने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार टाटा पॉवरमध्ये ऊर्जा वापर भाराचे पूर्वानुमान करण्यासाठी ब्ल्यूवेव-एआयच्या पद्धतीच्या लाभांना मान्यता देणारा ठरला आहे.
टाटा पॉवरचे टीअँडडीचे अध्यक्ष श्री संजय बंगा यांनी सांगितले, “आम्ही मुंबईमध्ये आमच्या रोजच्या वीज वितरणामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सला संचालित करण्यासाठी ब्ल्यूवेव-एआयसोबत काम करत आहोत. रिअल-टाइम ऑपरेशन्समध्ये क्लाऊड कॉम्प्युटिंगच्या माध्यमातून एआय सक्षम सिस्टिम सुधारणांसोबत काम करणे हे आमच्या पायाभूत व्यवस्थेला व परिणामी संचालन क्षमता व अचूकतेला वृद्धिंगत करते.”
ब्ल्यूवेव-एआयचे सीईओ श्री देवाशिष पॉल यांनी सांगितले, “ब्ल्यू-वेवमध्ये आमच्या टीमने आमच्या उत्पादनांना ऑनबोर्ड करण्यासाठी जटिल एआय तंत्रज्ञानांच्या अभिनव प्रारंभिक ऍडॉप्टर्सना आकर्षित केले आहे. आम्ही जगातील प्रमुख एआय क्लीनटेक कंपनी बनण्यासाठी टाटा पॉवरसारख्या प्रमुख वैश्विक वीज कंपन्यांसोबत काम करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.”
ते पुढे म्हणाले, “कॅनडामध्ये आमच्या सुविधांनी पहिले रिअल-टाइम एआय इलेक्ट्रिक युटिलिटी डिस्पॅच आणि स्टॅन्ड अलोन इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन्स दिली आहेत. आम्ही टाटा पॉवर मुंबई डिस्कॉमकडून रिअल-टाइम डेटाचा उपयोग करून आपल्या संचालनासोबत एकात्मिक करण्यासाठी आपल्या प्लॅटफॉर्मचा उपयोग करण्यात आणि भारतीय बाजारपेठेसाठी तातडीने प्रशिक्षित करण्यासाठी सक्षम होतो. हे तंत्रज्ञान आमच्या ग्राहकांना अशी सुविधा प्रदान करते ज्यामुळे ३५००० पेक्षा जास्त वार्षिक वीज डिस्पॅचेसमधून महत्त्वाचे आर्थिक लाभ प्राप्त होतात.”
ब्ल्यूवेव-एआय सॉफ्टवेयर एक सुविधा म्हणून फेब्रुवारी२०२० पासून २४X७X३६५ संचालित केले जात आहे. या सॉफ्टवेअरने गेल्या वर्षीच्या मुंबईतील कोविडसंबंधित शटडाऊन आणि लॉकडाऊनसाठी देखील जलद गतीने अनुकूलन केले. वर्तमान भागीदारी करार तीन वर्षांसाठी केला गेला असून तो पाच वर्षांपर्यंत वाढवण्याचा पर्याय त्यामध्ये ठेवला गेला आहे.