Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

बालपणीच ठरवलं…देशसेवेसाठी स्वराज घोसाळकर एनडीएत!

July 28, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
swaraj ghosalkar

मुक्तपीठ टीम

बालपणी जेव्हा सारेच खेळात मग्न असतात, फारतर त्यांचं कुटुंब त्यांच्या चांगल्या शिक्षणासाठी नामांकित शाळेत प्रवेशासाठी अट्टाहास करक असते, तेव्हा जोगेश्वरीच्या घोसाळकर कुटुंबाने मात्र आपल्या स्वराजला भारतीय सेना दलात अधिकारी बनवण्याचं स्वप्न पाहिलं. त्यांचं स्वप्न हे स्वराजचं स्वप्न झालं. नव्हे तो जणू तेच बाळकडू घेऊन जन्माला आला, कारण लहानपणारासून स्वराज हा फक्त आणि फक्त सेनादलातच जाण्याचं स्वप्न उरी बाळगून होता. आणि आता अखेर ते स्वप्न साकारलंय. या तरुणाची निवड एनडीएसाठी झालीय.

 

आपण आपल्या दैंनदिन जीवनात जे कष्ट, मेहनत घेत असतो त्यापाठी आपला उद्देश असतो. कठोर परिश्रम हा एक मार्ग आहे ज्याद्वारे आपण आपल्या जीवनात काहीही साध्य करू शकतो. आवश्यकता असते ती परिश्रमांना योग्य दिशाही मिळण्याची. मुंबईतील जोगेश्वरीतील स्वराज घोसाळकरने बालपणीच सेनादलाची दिशा निवडली. त्याने ती मनात भिनवली. आणि अखेर त्याची यूपीएसई- एनडीए-२०२० परीक्षेत देशपातळीवरील गुणवत्ता यादीत प्रथम प्रयत्नात १४९व्या क्रमांकावर निवड झाली आहे. स्वराजच्या या यशामुळे त्याच्या कुटंबाला आनंद झाला आहे.

 

दहावीला गेल्यावर बहुतांशी पालक मुलांच्या पुढील भविष्याच्या वाटचाली धावपळ करत असतात. मात्र स्वराजची उच्चशिक्षत समाजसेविका आई सुरक्षा घोसाळकर आणि उद्योजक वडील शशांक घोसाळकर यांनी स्वराजच्या जन्मापासूनच त्याला सेना अधिकारी बनवण्यासाठी घडवलं. त्यांनी त्याच्यासाठी तसेच नियोजन केले. स्वराजने केंद्रीय विद्यालय आयआयटी, पवई शाळेत इयत्ता दहावी सीबीएसई बोर्डात ९२% गुण प्राप्त केले होते. अभ्यासासोबत धनुर्विद्येत राष्ट्रीय पातळीवर रौप्य पदक, स्काउटचा राज्यपुरस्कार, इयत्ता पाचवी ते दहावी सिकॕडेटचे प्रशिक्षणात प्राविण्य मिळविले आहे. आई – वडील , आजीचे संस्कार आणि घडवणाऱ्या शिक्षकांमुळे मला हे यश मिळल्याचे स्वराज घोसाळकरने सांगितले.

 

स्वराज घोसाळकरचं यश कुटुंबाचं स्वप्न…

  • युपीएसई एनडीए २०२० परीक्षेत देशपातळीवरील गुणवत्ता यादीत झालेली स्वराज घोसाळकरची प्रथम प्रयत्नातील निवड ही त्याच्या कुटुंबियांच्या स्वप्नाची पूर्ती आहे.
  • स्वराजची आई सुरक्षा घोसाळकर , उद्योजक वडिल शशांक घोसाळकर, जन्मापासून संस्कार आणि संगोपनाची जबाबदारी घेणारी आजी गं.भा. नर्मदा लक्ष्मण पेडणेकर यांनी स्वराजचं स्वप्न आपलं मानलं, त्याच्यासारखंच परिश्रम केलं.
  • बहुतांश पालक इयत्ता दहावी मध्ये करिअर मार्गदर्शन आणि समुपदेशनाची धावपळ करतात, परंतू स्वराजच्या पालकांनी त्याच्या बालपणापासूनच तो सेना अधिकारी होण्यासाठी नियोजन केले होते. स्वराजनेही त्याचे शिक्षक, मार्गदर्शक आणि पालक यांच्या मार्गदर्शनाने पुढची वाट परिश्रमपूर्वक चालली.

 

स्वराजचं शैक्षणिक यशही घवघवीतच!

  • स्वराजने केंद्रीय विद्यालय आयआयटी, पवई शाळेत इयत्ता दहावी सीबीएसई बोर्डात ९२% गुण प्राप्त केले.
  • तो अभ्यासासोबत धनुर्विद्येत राष्ट्रीय पातळीवर रौप्य पदक, स्काउटचा राज्यपुरस्कार , इयत्ता पाचवी ते दहावी सिकडेटचे प्रशिक्षणात प्राविण्य मिळविले.
  • बारावी सायन्स सोबत एनडीएच्या पूर्व तयारी करीता त्याला कोल्हापूरच्या आर्म फोर्स प्रिपरेटरी इन्स्टिटयुटचे चेअरमन विश्वास कदम सर , संचालक मेजर चंद्रसेन कुलथे सर, शिक्षक अजय पाटील सर यांच्या सोबत एनसीसीचे दिलिप नारकर सर, कर्नल सुकुमारन सर, शारिरीक प्रशिक्षक शिवशंकर वाले सर, धनुर्विद्या प्रशिक्षक वैभव सागवेकर सर, भारत स्काऊट गाईड संस्थेचे राष्ट्रीय प्रशिक्षक तसेच महाराष्ट्र जिल्हा उपायुक्त संतोष परंडवाल सर यांचे मार्गदर्शन लाभले.
  • कोरोना संकट काळातही मुंबई येथून लेखी परीक्षेसाठी कर्नाटक आणि मुलाखतीकरीता विशाखापट्टणम येथे सुरक्षितपणे पोहचण्या करीता अखिल भारतीय मराठा महासंघाचे हंबीरराव शिंदे , परिमंडळ -१० चे पोलिस सहआयुक्त गोयल सर , वरिष्ठ पोलीस निरीक्षिका शुभदा चव्हाण मडम , पत्रकार संदिप कसालकर आणि आशिर्वाद लाभले.

 

स्थानिक आमदार वायकरांकडून कौतुक

“मध्यमवर्गीय कुटुंबातील स्वराजचे हे यश नक्कीच कौतुकास्पद असून तुझ्या पावलावर पाऊल ठेवत जोगेश्वरी मधील इतर अनेक विद्यार्थी देखील एनडीएत जाण्याची प्रेरणा लाभेल. तुझ्या यशाने जोगेश्वरीकर व मुंबईच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेल्या असल्याची भावना या निमित्ताने स्थानिक आमदार व माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी व्यक्त केली.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: JogeshwarimumbaiNDAravindra waikarUPSCजोगेश्वरीमुंबईरवींद्र वायकर
Previous Post

नव्या रुग्णांपेक्षा दुपटीनं १२ हजार ६४५ रुग्ण बरे होऊन घरी

Next Post

जन्मत: कान-नाक नसणाऱ्या मुलांना मिळणार थ्रीडी प्रिंटेड अवयव

Next Post
3D printed

जन्मत: कान-नाक नसणाऱ्या मुलांना मिळणार थ्रीडी प्रिंटेड अवयव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!