मुक्तपीठ टीम
अतिशय मेहनतीने, चिकाटीने आणि प्रामाणिकपणाने कागलच्या स्वप्निल माने यांनी यंदा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत बाजी मारली आहे. सोमवारी जाहीर झालेल्या या परीक्षेत स्वप्निल यांनी देशात ५७८ वा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे डोक्यावरील आई वडिलांचे छत्र नसताना स्वतः कमवून त्यांनी हे यश प्राप्त केले आहे.
स्वप्निल यांची शिकण्याची जिद्द!
- स्वप्निल हे लहानपनापासूनच अभ्यासात हुशार होते. त्यांची शिकण्याची जिद्द होती.
- स्वप्निल याचं प्राथमिक शिक्षण प्राथमिक विद्या मंदिर भागशाळा नदीकिनारा येथे झाले तर माध्यमिक शिक्षण सिद्धनेर्ली विद्यालय सिद्धनेर्ली येथे झाले.
- इयत्ता १० मध्ये ८४.७३ % गुण मिळवूनही परिस्थितीमुळे त्यांना आयसीआरई (ICRE ) गारगोटी येथे यांत्रिक अभियांत्रिकी (मेकॅनिकल डिप्लोमा ) साठी प्रवेश घ्यावा लागला.
- लहानपणीच आईच निधन झाल्याने परिस्थितीमुळे घराजवळ असणाऱ्या इक्बाल चाचा यांच्या फळाच्या गाडीवर काही काळ मदतनीस म्हणून काम केले.
डिप्लोमा मध्ये ८७.९४ गुण मिळवूनही पुढील शिक्षण घेण्याच्या अशा धूसर झालेल्या असताना महाराष्ट्र टाईम्स च्या ‘त्याच्या शिक्षणाच काय’ या बातमीमुळे त्यांना काही लोकांनी शिक्षणासाठी मदत केल्याने विश्वकर्मा इंस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी (VIT), पुणे या नामांकित शिक्षण संस्थेत बी.ई मेकॅनिकल साठी प्रवेश मिळवला.त्यामध्ये १० पैकी ९.३ क्रेडीट मिळवून २०१८ मध्ये तेथेही अव्वल स्थान मिळविले.
स्वप्निल यांच्या मदतीला जिजाऊ संस्था!!
- यापुढे स्पर्धा परीक्षा अभ्यास सुरू करायचा होता परंतु घरची आर्थिक परिस्थिती नसल्याने अभ्यासात अडचण येत होती, ही बाब जिजाऊ संस्थेला समजल्यावर स्वप्निल यांची शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संस्थापक निलेशजी भगवान सांबरे साहेब यांनी घेतली.
- जिजाऊ संस्थेच्या सहकार्याने झडपोली व पुणे येथे अभ्यास सुरु केला.
- पहिल्या दोन प्रयत्नात पूर्व परीक्षेत अपयश आल्याने खचून न जाता पुन्हा तयारी चालू ठेवली.
- दरम्यान वडिलांचं गावी अपघाती निधन झाल्याने पुन्हा संकट उभे राहिले.
- आई वडील या दोघांच्या मृत्यूने खचून न जाता घरामध्ये दोन लहान बहिणी, आज्जी आजोबा, पणजी यांचा सांभाळ करत अभ्यास सुरुच ठेवला.
संकटांवर मात करून स्वप्निल यूपीएससी उतीर्ण!
- कोरोना काळात पूर्व व मुख्य परीक्षेची तयारी करून दोन्ही परीक्षेत पात्र होवून मे २०२१ मध्ये मुलाखत झाली.
- अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये स्वप्निल माने यांनी मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे.
- विशेष म्हणजे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून होवूनही स्वप्निल माने यांनी UPSC परीक्षेसाठी पेपर लिहिण्यासाठी तसेच मुलाखतीसाठी माध्यम म्हणून इंग्रजी भाषेची निवड केली होती.
- त्यामुळे मराठी माध्यमातील मुले मागे पडतात हा समज स्वप्निल माने यांच्या यशाने खोटा ठरवला आहे.
- या यशामध्ये जिजाऊ संस्थेचे मोठे योगदान असल्याचे स्वप्निल ने असे आपले मनोगत व्यक्त केले.
पाहा व्हिडीओ:
https://youtu.be/UAd013afTNM