मुक्तपीठ टीम
केंद्रातील सत्ताधारी आपल्या सत्तेचा गैरवापर करत आहेत, हे आता कोणापासूनही लपलेले नाही. यातच भर म्हणून देशाच्या संसदेच्या आवारात विरोधकांना आंदोलन करण्यासाठी बंदी घातली गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेतील या आंदोलनबंदीचा निषेध केला आहे.
सुप्रिया सुळे यांनी ट्वीट्सद्वारे मांडलेले मत
केंद्र सरकारने संसदेच्या आवारात आंदोलन, निदर्शने, उपोषण आदी करण्यास बंदी घातली.सनदशीर मार्गाने विरोध दर्शविण्याचा हा लोकशाही प्रक्रियेतील महत्त्वाचा मार्ग अशा रितीने सरकारने बंद केला.हे अतिशय दुर्दैवी आहे.
संसदेच्या आवारातच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा भव्य पुतळा आहे. महात्मा गांधी यांनी सनदशीर मार्गाने सत्याग्रह या आयुधाचा वापर स्वातंत्र्यलढ्यात केला होता. त्यांच्याच पुतळ्यासमोर सनदशीर मार्गाने विरोध प्रकट करण्यास केंद्र सरकारने बंदी घातली हे अतिशय दुर्दैवी आहे.
— Supriya Sule (@supriya_sule) July 15, 2022
संसदेच्या आवारातच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा भव्य पुतळा आहे. महात्मा गांधी यांनी सनदशीर मार्गाने सत्याग्रह या आयुधाचा वापर स्वातंत्र्यलढ्यात केला होता. त्यांच्याच पुतळ्यासमोर सनदशीर मार्गाने विरोध प्रकट करण्यास केंद्र सरकारने बंदी घातली हे अतिशय दुर्दैवी आहे.
यापुर्वी काही शब्द असंसदीय ठरवून ते उच्चारण्यास बंदी घालण्यात आली. आता आंदोलनासही बंदी घालण्यात आली आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानातील अधिकार व स्वातंत्र्याचा हा संकोच आहे.
हा निर्णय लोकशाही व्यवस्थेस घातक असून त्याचा फेरविचार करणे अतिशय गरजेचे आहे. तरी केंद्र सरकारला माझी विनंती आहे की कृपया हा निर्णय तातडीने मागे घ्यावा.