Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी: सर्वोच्च न्यायालयाचे चौकशी समितीवर शिक्कामोर्तब, निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा असणार प्रमुख!

January 12, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Supreme Court on PM Modi Security Breach enquiry

मुक्तपीठ टीम

पंजाबमधील फिरोजपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटींच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने समिती स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा ​​यांच्या नेतृत्वाखाली ही समिती चौकशी करणार आहे. त्यांच्यासोबत पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक, पंजाबचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (सुरक्षा) आणि पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल, एनआयएच्या महासंचालकांचे प्रतिनिधी हे समितीत असतील.

 

सर्वोच्च न्यायालयाने चंदीगड उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारला पंतप्रधानांच्या भेटीशी संबंधित सर्व रेकॉर्ड चौकशी समितीच्या अध्यक्षा न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा ​​यांच्याकडे सोपवण्यास सांगितले आहे. समिती स्थापन करण्याचा मुख्य हेतू हा सुरक्षेत काय चूक झाली? तसेच जबाबदारी कोणाची? भविष्यात असं घडू नये यासाठी काय करता येईल? यासोबतच समिती लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचा प्रयत्न करेल, असा आहे.

 

हे आहेत कमिटीचे सदस्य

  • जस्टिस इंदु मल्होत्रा (अध्यक्ष)
  • एनआयएचे डीजी किंवा त्यांचे नियुक्त अधिकारी आयजीच्या दर्जापेक्षा कमी नाहीत
  • चंदिगडचे DGP
  • पंजाबचे ADGP (सिक्युरिटी)
  • पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे रजिस्टार जनरल

 

केंद्र आणि राज्य चौकशी बंद

  • पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींनंतर केंद्र आणि राज्य सरकारने चौकशी सुरू केली होती.
  • राज्याने गृह सचिव अनुराग वर्मा यांच्यासह उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मेहताब सिंग गिल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली.
  • त्याच वेळी, केंद्राने सुरक्षा सचिवांच्या अध्यक्षतेखाली इंटेलिजन्स ब्युरो आणि एसपीजी अधिकार्‍यांसह एक चौकशी समितीही स्थापन केली.
  • हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर हे दोन्ही तपास आता बंद झाले आहेत.
  • पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी केंद्रीय सुरक्षा संस्था आणि पंजाब पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

काय आहे प्रकरण?

  • ५ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाबच्या फिरोजपूर दौऱ्यावर होते.
  • तिथं पंतप्रधान मोदी एका राजकीय रॅलीला संबोधित करणार होते.
  • आधी ठरल्याप्रमाणे मोदींनी हेलिकॉप्टरनं सभास्थळी पोहोचणे अपेक्षीत होते.
  • पण पावसाळी वातावरणामुळे त्यात अचानक बदल झाला आणि ते बाय रोड जाण्याचा निर्णय घेतला.
  • त्याच प्रवासात स्थानिकांनी चालवलेलं आंदोलनामुळे हुसैनीवालापासून ३० कि.मी. अंतरावर मोदींच्या गाड्यांचा ताफा थांबवावा लागला.
    या आंदोलकांनी मोदींचा रस्ता ब्लॉक केला.
  • वीस मिनिटांपर्यंत ताफा एका पुलावरच थांबून राहिला.
  • शेवटी मोदी भटिंडा एअरपोर्टवर पोहोचले.
  • दिल्लीला बसण्यापूर्वी त्यांना स्थानिक अधिकाऱ्यांना, तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, त्यांच्यामुळे मी जीवंत परतलो अशा आशयाचं वक्तव्य केलं.
  • ज्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.
  • परिणामी पंतप्रधानांच्या सुरक्षेत ही मोठी चूक असल्याचं लक्षात आलं.

Tags: PM Narendra modipunjabSupreme Courtइंदू मल्होत्रापंजाबपंतप्रधान नरेंद्र मोदीसर्वोच्च न्यायालय
Previous Post

“राज्यातील शेतकरी संकटात, आत्महत्या वाढत्या! शेतकऱ्यांकडे लक्ष द्या सरकार…”

Next Post

लता मंगेशकर दोन वर्षे घराबाहेर आल्याच नाहीत, तरीही कोरोना कसा झाला?

Next Post
lata mangeshkar

लता मंगेशकर दोन वर्षे घराबाहेर आल्याच नाहीत, तरीही कोरोना कसा झाला?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!