सुश्रुषा जाधव / मुक्तपीठ टीम
कितीही प्रगती झाली, कितीही शिक्षण घेतलं तरीही अनेकदा स्त्रीला कमीच नाही तर तुच्छ लेखण्याचा प्रयत्न कायमच होताना दिसतो. अगदी काही स्त्रियाही तसं वागतात. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान एका वकिलाने स्त्री ही कुटुंबावरील ओझे असल्याचे म्हणताच न्या. धनंजय चंद्रचुड यांनी स्पष्ट शब्दात त्यांना सुनावलं. ते म्हणाले, “कोणत्याही मुलीचं कुणावरही ओझं नसतं!”
सर्वोच्च न्यायालयाने वडिलांकडून मुलीला भरणपोषण पोटगी देण्याच्या प्रकरणावर सुनावणी करताना स्पष्ट केले की, मुलींचं कोणावरही ओझ नसतं. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरु होती. वडिलांची बाजू मांडत असलेल्या वकिलाने सदर महिला ही एक ओझे असल्याचे सांगितल्यानंतर न्यायाधीशांनी ही टिप्पणी केली.
लेकींचं नसतं कुणावरही ओझं…
- न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी घटनेच्या कलम १४चा संदर्भ देत ही टिप्पणी केली.
- कलम १४ हे कायद्यासमोर सर्व समान असल्याची हमी देतो.
- या प्रकरणी संबंधित मुलगी वकील आहे आणि तिने न्यायिक सेवेची प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
- महिलेने तिच्या परीक्षेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे जेणेकरून ती तिच्या वडिलांवर अवलंबून राहू नये.
- खंडपीठाने वडिलांना ऑगस्टपर्यंत मुलीला ५० हजार रुपये देण्याचे आदेश दिले.