मुक्तपीठ टीम
चीनी स्मार्टफोन कंपनी यूलेफोनने आपला नवीन स्मार्टफोन पॉवर आर्मर -१३ लॉन्च केला आहे. या फोनमध्ये १३ हजार२०० एमएएचची बॅटरी आहे. कोणत्याही रग्ड स्मार्टफोनमध्ये आढळणारी ही सर्वात शक्तिशाली बॅटरी आहे. एकदा चार्ज केला की हा स्मार्टफोन ५ दिवस वापरता येतो. स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हील्यो जी९५ प्रोसेसरसह १टीबीपर्यंत विस्तारीत स्टोरेजही आहे.
महाशक्तिशाली सुपर स्मार्ट फोन
- या फोनमध्ये पॉवर बँकेसारखी बॅटरी आहे, ज्यामुळे त्याची जाडी २०.८ मिमी आहे.
- यात १३,२०० एमएएच बॅटरी आहे, जी ३३डब्ल्यूच्या वायर्ड आणि १५डब्ल्यू वायरलेस वेगवान चार्जिंगला समर्थन देते.
- यात पंच-होल कट आउट डिस्प्ले, साइड-माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
- क्वाड-रियर कॅमेरा सेटअप फोनच्या मागील बाजूस सेट करण्यात आला आहे.
- यात ६.८१ इंच आयपीएस एलसीडी फुल-एचडी + डिस्प्ले आहे.
- त्याचे रिझोल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आहे.
- हा स्मार्टफोन पाणी, शॉक आणि डस्ट रेझिस्टंट सर्टिफाईड आहे.
जबरदस्त कॅमेरा
- फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वाड-रियर कॅमेरा सेटअप करण्यात आला आहे.
- फोनमध्ये ८ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्स, २ मेगापिक्सेल मॅक्रो स्नॅपर आणि २ मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे.
- सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात १६ मेगापिक्सलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा मिळेल. १०. कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ ५.०, जीपीएस, एनएफसी, टाइप-सी पोर्ट ५ जी आहे.
- मीडियाटेक हीलिओ जी९५ प्रोसेससह फोनला ८ जीबी रॅम मिळेल.
- त्याच वेळी, त्याचे ऑनबोर्ड स्टोरेज २५६जीबी आहे.
- फोन १टीबी मेमरी कार्डला देखील सपोर्ट करतो.
- हा फोन अॅंड्रॉईड ११ ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.
यूलेफोन पॉवर आर्मर १३ ची किंमत
- चीनमध्ये या फोनची विक्री सुरू झाली आहे.
- लॉन्चिंग ऑफरमुळे, २ ऑगस्ट पर्यंत, हा फोन २२,२८० रुपयांमध्ये खरेदी करता येत होता.
- आता त्याची किंमत ३७००० रुपये होण्याची शक्यता आहे.
- या फोनच्या भारतातील लॉन्चिंगविषयी कंपनीने अद्याप काहीही सांगितले नाही.