मुक्तपीठ टीम
अभिनेत्री सनी लिओनचा सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक चाहते थक्क झाले. फुटलेले ओठ आणि पायात खोल जखमा पाहून चाहते गंभीर झाले आणि कमेंट करून तिची अवस्था विचारू लागले. एका यूजरने विचारले की, बेबी डॉलला काय झाले आहे? त्याचवेळी आणखी एका युजरने कमेंट केली की, अभिनय करतानाही मी तुला या अवस्थेत पाहू शकत नाही. हा व्हिडीओ आतापर्यंत १३ लाख वेळा पाहिला गेला आहे.
अभिनेत्री सनी लिओनी आपल्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर ती खूप अॅक्टिव्ह असते. ती चाहत्यांसाठी तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री गंभीर जखमी झालेली दिसत आहे.
शूटिंग दरम्यान तयार केलेला व्हिडीओ
- सनी लिओनीच्या चाहत्यांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे तिची दुखापत खरी नाही.
- खरंतर तिने हा व्हिडीओ शूटिंगदरम्यान बनवला होता. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी जास्त नाराज होऊ नये म्हणून हा व्हिडीओ शूटिंगचा असल्याचे कॅप्शनमध्ये तिने इशाराही दिला होता.
- तिने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘एजंट एमच्या आयुष्यातील एक सामान्य दिवस. मला कशाप्रकारे दुखापत झाली हे जाणून घेण्यासाठी #अनामिका पाहा.’
अनामिकाला वेगवेगळ्या प्रतिक्रिया
- सनी लिओनीची नवी वेब सीरिज ‘अनामिका’ एमएक्स प्लेयरवर रिलीज झाली आहे.
- ही सीरिज पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. काही लोकांना ही मालिका आवडली आहे, तर अनेकांचे म्हणणे आहे की त्यांना यात नवीन काही पाहायला मिळाले नाही.
- या वेब सिरीजला आयएमजीबी वर ६.६ स्टार रेट करण्यात आले आहे.