मुक्तपीठ टीम
गेल्या काही दिवसांपासून कॉमेडियन सुनील पालचा एक व्हिडीओ भलताच वादात सापडला आहे. सुनीलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कोरोना काळात काम करणाऱ्या डॉक्टरांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले होते. या व्हिडिओमुळे असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्स (मुंबई)च्या वतीने सुनीलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर मात्र त्याचं डोकं ठिकाणावर आलं असावं. त्यानं आता डॉक्टरांची माफी मागत सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
व्हिडीओ -१
व्हायरल व्हिडीओमध्ये बोलला होता ‘राक्षस’
- एप्रिल महिन्यात सुनील पालचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.
- त्याने कोरोना काळात काम करणाऱ्या डॉक्टरांना चोर आणि राक्षस म्हणून संबोधले.
- सुनील त्या व्हिडीओत म्हणाला की, डॉक्टर लोकांची फसवणूक करीत आहेत.
- ज्यांना कोरोनाची लागण नाही त्यांचाही अहवाल पॉझिटिव्ह देत आहेत.
Sorry doctor’s 🙏🙏🙏🙏 #doctorsaresaviours #AIIMS @AmitShah @AmitShahOffice @PMOIndia @ANI @ndtv @ndtvindia @ABPNews @AIIMSRDA @AMCMUMBAI @CMOMaharashtra @OfficeofUT @AUThackeray @rajeshtope11 @MumbaiPolice @CPMumbaiPolice @DGPMaharashtra :- https://t.co/X1sE39oEgQ pic.twitter.com/0U72sOIviU
— Sunil Pal Comedian (@iSunilPal) May 5, 2021
व्हिडीओ – २
- डॉक्टरांना देवासमान मानलं जातं
- अंधेरी पोलीस ठाण्यात माझ्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
- वैद्यकीय संबंधित लोक म्हणतात की मी त्यांच्यासाठी आणि डॉक्टरांसाठी अपशब्द वापरले.
- मात्र मी हे सर्वांना बोललो नव्हतो, आज ही माझ्यासाठी डॉक्टर हे देवासमान आहेत.
- कधी काही घडले तर संबंधित व्यवसायाला नाव ठेवली जातात.
- माझे मन मला अजूनही सांगते की चुकी झाली असेल आणि कोणाचे मन दुखावले असेल तर माफी मागतो.
- आपण सर्व हजारो वर्षे जगा.
- एकदा पुन्हा रिअली रिअली सॉरी.