Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी शेळी- मेंढी विकास कार्यक्रम महत्वाचा – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

February 23, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Sunil-Kedar

मुक्तपीठ टीम

ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्राचे बळकटीकरण व आधुनिकीकरण करण्याबरोबरच शेळी-मेंढी विकास कार्यक्रम राबविणे महत्त्वाचे असल्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

मंत्रालयात भागभांडवल निधीमधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ प्रक्षेत्राचे बळकटीकरण व आधुनिकरण याविषयी आयोजित बैठकीत ते बोलत होते.यावेळी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता, सह सचिव माणिक गुट्टे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शशांक कांबळे यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणाले, राज्यात शेळी-मेंढीपालन व्यवसाय हा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून किफायतशीर ठरलेला आहे. पशुपालन व्यवसाय हा राज्याच्या अर्थव्यवस्थेतील एक महत्वाचा भाग आहे कारण राज्यातील ७० टक्के लोकसंख्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. शेळी-मेंढीपालन व्यवसाय दुष्काळी व निमदुष्काळी भागात करण्यात येत असल्याने शासकीय योजनेचा लाभ देवून या व्यवसायास देशात अग्रस्थानी आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

सुनील केदार म्हणाले, महामंडळाचे भागभांडवल ६ कोटी असून रुपये ९४ कोटी प्रस्तावित आहेत. यामध्ये प्रस्तावित ९४ कोटी निधी मधून महामंडळाच्या प्रक्षेत्राचे बळकटीकरण व आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये पैदाशीकरिता पायाभूत सुविधा, शेळ्या-मेंढ्यांची खरेदी, नवीन वाडे बांधकाम, शेळ्यांमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रम राबविणे ,मुरघास निर्मिती यंत्रसामग्री खरेदी, शेळी मेंढी पालन प्रशिक्षण केंद्र इमारत बांधकाम, प्रशिक्षणार्थी निवासी इमारत बांधकाम, जमिन विकास, सिंचन सुविधा, ट्रॅक्टर ट्रॉली, कृषी अवजारे खरेदी व चारा कापणी यंत्र, वैरण गोडावून, शेळी मेंढी खाद्य कारखाना उभारणी, कार्यालय बांधकाम, कर्मचारी निवासस्थान, प्रक्षेत्रावरील आवश्यक साधनसामग्री, अल्ट्रा सोनोग्राफी मशीन, फिरते शेळी मेंढी चिकित्सालय आदी सुविधा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


Tags: Dr.Shashank KambleJ.P GuptaManik GutteSUNIL KEDARजे.पी.गुप्ताडॉ.शशांक कांबळेमाणिक गुट्टेशेळी- मेंढी विकास कार्यक्रमसुनिल केदार
Previous Post

राम कदम म्हणतात, ईडीची कारवाई वाईट कृत्याच्या विरोधात! भातखळकरांची विचारणा, सूडाचं राजकारण कोणाचं?

Next Post

यशोमती ठाकूरांचं ईडीला आव्हान…या शिवाजी पार्कात!

Next Post
Nawab Malik Yashomati Thakur

यशोमती ठाकूरांचं ईडीला आव्हान...या शिवाजी पार्कात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!