Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

चंद्रमुखी: सारं काही देखणं तरी…पण एकदा तरी नक्कीच पाहा!

May 1, 2022
in featured, व्हा अभिव्यक्त!
0
Chandramukhi

सुमेधा उपाध्ये / व्हा अभिव्यक्त!

“आम्ही खूप मेहनत घेतलीय. जे जे उत्तम आहे ते सर्व केलंय…आता चित्रपटगृहात या आणि हा चंद्रमुखी पहा…” ही भावनिक साद सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकरने घातली. मन हेलावलं आणि चित्रपट पाहण्यासाठी घरातच प्रमोशनचा भाग झाले.

 

आज चंद्रा अवतरली आहे चित्रपटगृहात मग जाताय का नाही मंडळी पाहायला, गेल्यावर
फोटो घेऊन आम्हाला tag करायचं नका विसरू.😍#चंद्रमुखी #Chandramukhi#चित्रनगरी pic.twitter.com/FPPuLrODVr

— चित्रनगरी (@Chitranagri) April 29, 2022

सोशल मीडियावरील गाणी…लावणी, संवाद, मुलाखती सर्व पहात होते. ऐकत होते. अखेर प्रतीक्षा संपली. शनिवारी दुपारी लेकाला सांगितलं संध्याकाळी ७च्या शो ची तिकिटं काढ. लेक कामाला लागला. उत्साहात म्हणाला शेवटच्या रांगेत दोनच सीट आहेत. मी उत्साहात म्हणाले काढ काढ लगेचच. पाच मिनिटातच तिकिट माझ्या व्हॉटसअॅपवर आली. संध्याकाळी वेळेच्या १० मिनिटे आधीच पोहचले.

चित्रपटगृहाचा दरवाजा उघडला आणि आम्ही दोघेच आत. पाच दहा मिनिटांनी अजून काही जण येत राहिले. राष्ट्रगीतासाठी उभी राहिले आणि ते पूर्ण होतास चित्रपटगहातील डोकी मोजली तर ३७. आमची रांग भरलेली समोरची अधून मधून आणि शेवटून ४ रांगा बऱ्यापैकी भरलेली. चंद्रमुखीच्या श्रेयनामावली सुरु झाल्या. पहिला नावांचा फलक झळकला. पार्टनर कोण कोण वगैरे आणि अजून काहीजण आले. राहावलं नाही, पुन्हा मोजले संख्या ५४. नंतर काही वेळाने अजून काही आले. मध्यंतरात पटापट मोजण्याचा प्रयत्न तर संख्या साधारण ५० ते ५५.

अतिशय मेहनत करून बनवलेला भव्य चित्रपट. त्यातील गाणी संगीत, नृत्य, अभिनय, दिग्दर्शन सर्वच उत्तम. संजय नेमाणेंची सिनेमॅटोग्राफी असल्याने ती मस्तच. चित्रपटाच्या पहल्या फ्रेमपासून आपलाही प्रवास सुरु होतो. साधारण पावणे दोन ते दोन तासांनी मध्यंतर आहे. मृणमयी देशपांडे, मोहन आगाशे, अमृता खानविलकर, समीर चौगुले अशा सर्वांचीच काम अप्रतीम आहेत.

बरेच दिवसांनी एक चांगला चित्रपट मराठीत आला आणि तो आवर्जून पहावा असं म्हणता येईल. मात्र, यातील मुख्य पात्र दौलतराव देशमाने थोडं फिकं पडलं. त्याचा धेयधुरंदर राजकारणीपणा संपूर्ण चित्रपटात हरवलाय. कारण मुरब्बी राजकारणी ते वाटत नाहीत. प्रयत्न केलाय तरीही. मी चित्रपट रसिक प्रेक्षक आहे. अगदी तांत्रिकबाबी किंवा सूक्ष्मता कळत नसली तरी धुरंदर राजकारणी व्यक्तीस आवश्यक गुण इथं हरवलेत असं वाटं.

कारण कुभांड रचलं जातंय आणि आपला खरा विरोधक कोण ही भनकही दौलतरावांना लागत नाही. त्याचे सासरे त्याला या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग सूचवतात. आतून पूर्ण तुटलेली, प्रचंड प्रेम केलं तरी नवऱ्याला आपल्यापेक्षा कुणी तमासगीर आवडते, याचा प्रचंड राग मनात खदखदतोय. बदनामी होतेय तरीही वडिलांच्या शब्दासाठी प्रेसला नवऱ्या सोबत येते आणि पत्रकारांना उत्तम हाताळते. आरोप खोडून काढते आणि नंतर बत्ताशाच्या मदतीनं चंद्रमुखीसमोर येते.

अशा नाजूक स्थितीत अडकलेला दौलतराव चाणाक्षपणे ना हायकमांडची वेळ मिळवू शकत ना बातमी दाबू शकत. ना स्वत:च्या विवाहबाह्य प्रेमाची साथ देऊ शकत. तो उत्तम ऐकणारा वाटत राहतो. राजकीय व्यक्तीची प्रेमकहाणी बरी वाटली तरी धुरंदरपणा हरवल्याने ती राजकारण्याची वाटत नाही. तरीही अन्य सर्वांचाच अभिनय कसदार झाल्यानं तसंच उत्तम साज ल्यायल्याने हा चित्रपट मराठी कलावंतांच्या आणि दिग्दर्शक प्रसाद ओकच्या मेहनतीसाठी एकदा पहावा असा नक्कीच आहे.

 

‘चंद्रमुखी’च्या लावणी आन् लावण्याची बातच न्यारी,
पाहण्यासाठी आता गाठा की ओ तिकीट बारी…!#Chandramukhi #AdvanceBooking #BookNow – https://t.co/DL0XPqID35#Chandramukhi #चंद्रमुखी #1DayToGo #Chandramukhi29April pic.twitter.com/IOpXqynVGu

— Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) April 28, 2022

तमासगीरांचं जीवन, चीरा भरणी असे विषय नवीन आहेत. भव्यदिव्यतेसह अमृता खानविलकरचे नृत्य, तिचं सौंदर्य आणि मृण्मयीच्या अभिनयासाठी तसंच मराठी चित्रपटाच्या भविष्यासाठी तरी असे चित्रपट पाहण्याठी चित्रपटगृहात जावंच जावं.

 

#Repost | #SBAB
‘CHANDRAMUKHI’ MAGIC ON THE RUNWAY, TODAY THE MAKERS OF THE FILM TOOK THE FILM PROMOTIONS TO MUMBAI AIRPORT WHERE AN ENCHANTING TAMASHA STYLE FLASH MOB HEADLINED BY @AmrutaOfficialK THE LEAD FACE OF THE FILM!#Chandramukhi #चंद्रमुखी #InCinemasNow@prasadoak17 pic.twitter.com/e03Hu02U9n

— Planet Marathi OTT (@PlanetMOTT) April 29, 2022

 

सध्या सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरलेला ‘चंद्रमुखी’ हा प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकरांची निर्मिती आहे. त्यांचं नावं आलं की दर्जाशी तडजोड नाही, हे ठरलेलंच असतं. त्यांनी या मराठी चित्रपट निर्मितीसाठी कोणतीही काटकसर केलेली नसल्याचं उच्च निर्मिती मूल्यांमुळे स्पष्ट जाणवतं. तसेच त्यांनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही एखाद्या बॉलिवूडपटासारखीच अगदी विमानांवरून अगदी गगनभेदी झेप घेतल्याचंही दिसतंय. हे सारं अभिमान वाटावा असंच. असाच अभिमान आपण बॉक्स ऑफिस कलेक्शन विक्रमी करत वाढवला पाहिजेच, असं वाटतं.

 

Sumedha upadhye
(सुमेधा उपाध्ये या गेल्या दोन दशकांपासून मराठी पत्रकारितेत आणि लेखन क्षेत्रात सक्रिय आहेत. प्रिंट आणि टीव्ही पत्रकारितेसोबतच त्यांचं सामाजिक, अध्यात्मिक क्षेत्रातही महत्वाचं योगदान आहे.)


Tags: Amruta KhanvilkarChandramukhiPrasad OakSumedha Upadhyeचंद्रमुखीसुमेधा उपाध्ये
Previous Post

चीनी मोबाइल कंपनी शाओमीमागे का ईडीपिडा? समजून घ्या चीनी कंपन्यांचं गुप्तधन रॅकेट…

Next Post

मनसेच्या ‘राज’सभेसाठी संभाजीनगरच का? कारण आहे ३४ वर्ष जुनं!!

Next Post
Raj Thackeray (5)

मनसेच्या 'राज'सभेसाठी संभाजीनगरच का? कारण आहे ३४ वर्ष जुनं!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!