मुक्तपीठ टीम
भारताने बुधवारी ओडिशाच्या किनारपट्टीवरील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून अग्नी-३ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) सूत्रांनी ही माहिती दिली. अग्नी-3 हे मध्यवर्ती श्रेणीचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (SFC) च्या नेतृत्वाखाली आयोजित नियमित प्रशिक्षण प्रक्षेपणाचा ही चाचणी भाग होती. प्रक्षेपण पूर्वनिर्धारित श्रेणीत केले आहे. क्षेपणास्त्राची चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली.
३ हजार ५०० किमी अंतरावरील लक्ष्यावर मारा करण्यास सक्षम!!
- अग्नी-3 हे अग्नी क्षेपणास्त्र मालिकेतील तिसरे क्षेपणास्त्र आहे आणि त्याची पहिली चाचणी ९ जुलै २००६ रोजी घेण्यात आली.
- पण त्यात तांत्रिक अडचण निर्माण झाली आणि ते लक्ष्याला न जाता ओडिशाच्या किनारपट्टीवर समुद्रात पडले.
- हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यास आणि ३ हजार ५०० किमी अंतरावरील लक्ष्यावर मारा करण्यास सक्षम आहे.
यााधीही या क्षेपणास्त्राची घेण्यात आली होती चाचणी!!
- अग्नी-3 क्षेपणास्त्राची २००७ मध्ये दुसऱ्या उड्डाणात आणि २००८ मध्ये सलग तिसऱ्या प्रक्षेपणात यशस्वी चाचणी घेण्यात आली.
- भारताने ओडिशाच्या किनारपट्टीवर स्वदेशी नवीन पिढीच्या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी प्राइमची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर एका महिन्यानंतर हे प्रक्षेपण झाले आहे.
- डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने सांगितले की, या क्षेपणास्त्राची पल्ला १ हजार किमी ते २ हजार किमी दरम्यान आहे.