Thursday, March 12, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जे. जे. रुग्णालयात दोन महिन्याच्या बाळाच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया!

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केला डॉ. कल्याण मुंडे यांचा सत्कार

December 31, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
J.J. hospital

मुक्तपीठ टीम

दोन महिन्याच्या बाळाच्या  ह्रदयाला असलेल्या छिद्रावर यशस्वी शस्रक्रिया करुन या लहानग्याला जीवनदान देणाऱ्या जे. जे. रुग्णालयाच्या कॉर्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. कल्याण मुंडे यांचा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी मंत्रालयात पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

 

कर्नाटकच्या गुलबर्गा येथील रहिवासी आणि मुंबईत रोजगारासाठी आलेल्या राहुल राठोड यांच्या दोन महिन्याच्या लहान मुलाला श्वास घेण्यास त्रास आणि पुरेशी झोप येत नसल्याचे निदर्शनास आले, त्यानंतर त्यांनी गुलबर्गा येथील रुग्णालयात या बाळाच्या चाचण्या केल्या त्यावेळी या बाळाच्या हृदयाला ६ मि.मि. आकाराचे छिद्र असल्याचे निदर्शनास आले. काही डॉक्टरांशी संपर्क केल्यानंतर हृदयाचा आकार लहान असल्यामुळे शस्त्रक्रिया करण्यास अडचण असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर राठोड यांनी जे. जे. रुग्णालयात जाऊन डॉ. मुंडे यांच्याशी संपर्क साधला. खुली शस्त्रक्रिया न करता त्यांनी ट्रान्सकॅथेटर प्रक्रियेद्वारे ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. शस्त्रक्रियेनंतर बाळाच्या प्रकृतीत सुधारणा होत असून बाळाचा आहार आणि झोप व्यवस्थित होत असल्याचे दिसून आले आहे.

 

डॉ. कल्याण मुंडे यांनी अवघड शस्त्रकिया यशस्वी करुन बाळाला नवजीवन दिल्याबद्दल मंत्रालयात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी डॉ. मुंडे यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, उपसचिव प्रकाश सुरवसे, पत्रकार अमेय तिरोडकर, मंगेश चिवटे, दीपक कैतके आदी उपस्थित होते.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Cardiac SurgeryDr. Kalyan Mundegood newsJ.J. hospitalMedical Education Minister Amit Deshmukhmuktpeethगुड न्यूजजे.जे. रुग्णालयडॉ. कल्याण मुंडेमुक्तपीठवैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुखहृदय शस्त्रक्रिया
Previous Post

उद्योगपती श्रीमंतीनं कुबेरासारखा, मनानं आभाळाएवढा, वाढदिवस कप केकनं साजरा!

Next Post

सक्तीच्या मानकांचे उल्लंघन करत प्रेशर कुकरची ऑनलाईन विक्री, १५ ई-कॉमर्स कंपन्यांना नोटीस

Next Post
pressure cooker

सक्तीच्या मानकांचे उल्लंघन करत प्रेशर कुकरची ऑनलाईन विक्री, १५ ई-कॉमर्स कंपन्यांना नोटीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!