मुक्तपीठ टीम
भारतीयांमध्येही नवं काही करून दाखवण्याची वृत्ती वाढतच चालली आहे. अभिमान बाळगावं असं नवं नाव आहे प्रख्यात ते रसायन शास्त्रज्ञ रवींद्र चड्ढा यांच्या शोधाचं. चढ्ढा यांनी वैद्यकीय विज्ञानात मोठा बदल घडवून आणू शकेल अशी सामग्री तयार केली आहे. त्यांनी एक विशेष प्रकारचा बायो-सिरेमिक ‘हायड्रॉक्सीपेटाइट’ घटक पदार्थ तयार केला जो हाडांसाठी चांगला पर्याय म्हणून वापरता येऊ शकेल. तो बनवण्यासाठी त्यांनी मायक्रोवेव्ह ओव्हनचा वापर केला आहे.
हाडांना पर्याय किंवा दुरुस्तीसाठी चांगला पर्याय
• वैद्यकीय विज्ञानामध्ये हाडांसाठी असे बरेच पर्याय आहेत.
• परंतु या नवीन घटक पदार्थापासून शरीरावर वाईट परिणाम होण्याची शक्यता फारच कमी आहे.
• ज्या रुग्णांच्या हाडांमध्ये गॅप आहे किंवा हाडे बदलण्याची गरज आहे अशा रुग्णांसाठी ही सामग्री अत्यंत प्रभावी ठरते.
‘सॅनट्रोसियम’च्या वापरामुळे फायदा
• चढ्ढा यांनी शोधलेला नवा घटक पदार्था हाडांना पेशींसह विकसित होण्यास मदत करतो.
• त्याच्या वापरामुळे कोणत्याही प्रकारची बाधा होत नाही आणि हाडे मजबूत होताता.
• ‘हायड्रॉक्सीपेटाइट’ नावाच्या या घटक पदार्थात असे काही घटक आहेत जे आपल्या हाडांमध्ये आणि दातात आधीपासून आहेत.
• चढ्ढा यांनी घटक पदार्थ बनवण्यासाठी कॅल्शियमऐवजी ‘सॅनट्रोसियम’ वापरले आहे.
• ‘सॅनट्रोसियम’मुळे हाडे आणखी मजबूत होतील.
• ‘सॅनट्रोसियम’मुळे हाडं पुन्हा क्रॅक होणार नाही आणि गॅपही येणार नाही.
डॉ. चड्ढा यांनी सांगितले की, “संशोधन कार्य चालू असताना घटक पदार्थ तयार करण्यासाठी इलेक्ट्रिक फर्नेसऐवजी मायक्रोवेव्ह ओव्हनचा वापर केला होता. या तंत्राला ‘मायक्रोवेव्ह सिनटिंग’ म्हणतात. घरातील ओव्हनला प्रथम १२०० डिग्री सेल्सियस तापमानावर सामग्री गरम करण्यासाठी ठेवावे लागते. इलेक्ट्रिक फर्नेसमध्ये साहित्य तयार करण्यास १४ तास लागतात, परंतु मायक्रोवेव्ह सिनटरिंगमध्ये ते केवळ ५० मिनिटांत तयार होते.