मुक्तपीठ टीम
सीबीआयचे नवे संचालक म्हणून महाराष्ट्राचे माजी महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारताच जयस्वाय यांनी आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड निश्चित केला आहे. सीबीआयच्या नव्या संचालकांच्या आदेशानुसार आता एजन्सीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयामध्ये फॉर्मल पोशाख घालणे अनिर्वाय असणार आहे. यापुढे कार्यालयात जीन्स, टी-शर्ट आणि स्पोर्ट शूज चालणार नाहीत. हे आदेश जयस्वाल यांच्या मंजुरीनंतर उपसंचालक अनूप टी मॅथ्यू यांनी जारी केले आहेत.
टी शर्ट, स्पोर्ट्स शूज विसरा…
• पुरुष अधिकाऱ्यांसाठी असे आदेश देण्यात आले आहेत की, कार्यालयात फक्त फॉर्मल शर्ट-पँट आणि फॉर्मल शूज घालावेत.
• त्यांनी व्यवस्थित दाढी करुनच कार्यालयात यावे लागेल.
• तसेच महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालायत असताना केवळ साडी, सूट आणि फॉर्मल शर्ट घालण्यास सांगितले आहेत.
• सीबीआयच्या सर्व विभागीय प्रमुखांना असे सुचित करण्यात आले आहे की, जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सक्तीने पालन करणे गरजेचे आहे.