मुक्तपीठ टीम
पुणे येथील ‘एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट’चे प्रणेते राहुल कराड यांच्या विचारचिंतनातून ‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसद’ स्थापन करण्यात आली आहे. या सरपंच संसदेच्या कोकण विभाग समन्वयक पदी
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील मयेकरवाडीचे भूमिपुत्र, ज्येष्ठ नेते, मुंबई येथील ‘सिद्धिविनायक ट्रस्ट’ चे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याचे ग्रामीणविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी शाल, पुष्पगुच्छ व निवडपत्र देऊन ही निवड करण्यात आली.
‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदे’चे प्रमुख समन्वयक योगेश पाटील, सहसमन्वयक प्रकाशराव महाले, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक संतोष राणे, नाशिक विभाग समन्वयक संजय भांबर व नाशिक विभाग सह समन्वयक सुनील दराडे हे यावेळी उपस्थित होते.
पंचायतराज व्यवस्थेतील लोकनियुक्त प्रतिनिधींचे अराजकीय स्वरूपात संघटन करणे, त्यांना ग्रामीण विकासाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी त्यांना विविध उपक्रमांचे आयोजन करून सहकार्य करणे तसेच केंद्र व राज्य शासन व ग्रामीण लोकप्रतिनिधी यांच्यातील विधायक संवाद अधिकाधिक वाढण्यासाठी समन्वय करणे हे ‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदे’ चे प्रमुख उद्दिष्ट आहे.