Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वार्तांकनासाठी निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास उपयुक्त- डॉ. अनंत कळसे

विधान परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, मुंबईतर्फे पत्रकारांसाठी वार्तालाप

June 17, 2022
in घडलं-बिघडलं
0
Dr. Anant Kalse

मुक्तपीठ टीम

थोडीशी किचकट, तांत्रिक माहितीवर आधारित असली तरी, नेमकेपणाने वार्तांकन करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया जाणून घेणे, त्याचा अभ्यास करणे उपयोगी ठरेल, असे मत विधान मंडळाचे माजी प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी व्यक्त केले. २० जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणूक प्रक्रिया समजून घेण्यासाठी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, मुंबई यांनी मंत्रालय पत्रकार कक्षात आयोजित वार्तालापात ते बोलत होते. यावेळी विधान मंडळाचे माजी उपसचिव सुभाषचंद्र मयेकर उपस्थित होते.

डॉ. कळसे यांनी पत्रकारांशी निवडणूक प्रक्रिया त्यातील संबंधित तांत्रिक बाबी यासंदर्भात संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडून येण्यासाठी मतांचा कोटा, प्रत्येक मतांचे मूल्य किती असते, सरप्लस मते म्हणजे काय, मतमोजणी प्रक्रिया कशी होते, मतपत्रिका कशी बाद होते, मतदान करताना सदस्यांनी कोणती काळजी घ्यावी इत्यादी अनेक तांत्रिक, किचकट बाबींवर प्रकाश टाकला. मतदान प्रक्रिया सोदाहरण स्पष्ट करुन दिली. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूकीतील बारकावे, फरक स्पष्ट केले. ब्रिटीश पार्लमेंटच्या निवडणूक प्रक्रियेशी भारतीय निवडणूक प्रक्रियेचा जवळचा संबंध असल्याने त्याचाही अभ्यास करण्याचा सल्ला उपस्थितांना दिला. 

मयेकर यांनी विधान परिषदेची निवडणूक प्रक्रिया स्पष्ट केली. प्रपोशनल रिप्रेझेंटेशन (प्रमाणशील प्रतिनिधित्व) मुळे विविध घटकांना प्रतिनिधित्व मिळत असल्याचे सांगीतले. राष्ट्रपती निवडणूकीसाठी राज्यातील मतांचे मूल्य सांगितले. भारतीय संविधानात असलेल्या विविध तरतूदींची माहिती दिली. ही प्रक्रिया समजून घेण्यामुळे आपल्या माहिती व ज्ञानात भर पडण्यास मदत होईल असे श्री. मयेकर म्हणाले.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर यांनी निवडणुकीचा गाभा न कळल्यास वार्तांकन करता येत नाही. या निवडणुकीची प्रकिया, तपशील, खाचाखोचा समजून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे कार्यवाह प्रमोद डोईफोडे यांनी पाहुण्यांचे स्वागत करुन ओळख करुन दिली.

यावेळी योगेश त्रिपाठी, मिलिंद लिमये, शाम हांडे, वैशाली होगले, बाळासाहेब पाटील, प्रशांत बारसिंग, राजू झनके, अजय गोरड, संतोष प्रधान, राजेंद्र थोरात यांच्यासह विविध वृत्तपत्रे, वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 


Tags: airingDr. Anant Kalseelection processLegislative Council ElectionMinistry and Legislative News Associationmuktpeethmumbaiडॉ. अनंत कळसेनिवडणूक प्रक्रियामंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघमुक्तपीठमुंबईवार्तांकनविधान परिषद निवडणूक
Previous Post

धरण सुरक्षितता कायद्यांतर्गत महाराष्ट्रातील धरणांच्या सुरक्षिततेला गती मिळावी – जयंत पाटील

Next Post

बालकांना संरक्षण देवून त्यांचे उज्ज्वल भविष्य घडवूया – मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Next Post
Min Yashomati Thakur Meeting 1

बालकांना संरक्षण देवून त्यांचे उज्ज्वल भविष्य घडवूया - मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!