मुक्तपीठ टीम
गौतम गांगुर्डे या विद्यार्थ्याचा अभिमान वाटतो! शेतकरी नेते संदीप जगताप यांचं हे वाक्य कानी ऐकलं आणि खूप बरं वाटलं. शेतकऱ्यांसाठी लढतानाचा समाजातील नवी पिढीही घडवतात. त्यामुळे त्यांनी गौतम गांगुर्डे या विद्यार्थ्याविषयी कळवले तेव्हा त्यांचा उद्देशच होता मुक्तपीठवर ही चांगली बातमी आलीच पाहिजे.
त्यांनी मांडलेली त्यांच्या विद्यार्थ्यांच्या संघर्षाची यशोगाथा त्यांच्याच शब्दात:
नुकताच वणी येथे इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. तिथं मला बोलावले होते. तो भव्य दिव्य पेट्रोल पंप माझा विद्यार्थी गौतम गांगुर्डे व त्याचा लहान भाऊ सिद्धार्थ गांगुर्डे यांनी उभा केलाय. एक काळ डोक्यावर मोळी घेऊन गावात येणाऱ्या गरीब शेतकरी कुटुंबातील ही पोरं आहेत. आयुष्यभर वडिलांनी शेती केली. दोन वर्षांपूर्वीच त्यांचे दुःखद निधन झालं. वडिलांनंतर दोघांनी घर सावरलं. आता आईच्या हस्ते उदघाटन केलं. याचं विशेष मला कौतुक वाटलं. आपण जे पेरत आलोय ते उगवलं की शिक्षक म्हणून आनंद होतो. अभिमान वाटतो.
या कार्यक्रमाला मंत्रालयाचे अवर सचिव अंबादास चंदनशिवे , राविभाऊ सोनवणे, किरण गांगुर्डे, संतोष रेहरे, सचिन कड , विलास कड, प्रवीण पाटील यांच्या सह असंख्य जिवाभावाचे मित्र उपस्थित होते.
बहुजन समाजातील असून देखील गौतम व सिद्धार्थ या नव्या व्यवसायात पाऊल टाकताय.वडिलांचे आशीर्वाद व आईची साथ तुमच्या पाठीशी असल्यामुळे तुम्ही यशस्वी व्हाल याची मला खात्री आहे. स्वाभिमानी परिवाराकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो..!!
◼️संदीप जगताप
प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना